Prithviraj Chavan : व्यक्तिगत प्रगतीपेक्षा सार्वजनिक व सामाजिक प्रगतीवर भर दिला. त्यामुळेच आजच्या राजकीय परिस्थितीत सुद्धा ताठ मानेने सन्मानाने राहात आहे, असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
जुने मालखेड, मालखेड, रेठरे खुर्द, वाठार, आटके येथे प्रचार दौऱ्यात ते बोलत होते. शिवाजीराव मोहिते, अॅड. नरेंद्र नांगरे- पाटील, युवा नेते इंद्रजित चव्हाण, दिग्विजय पाटील, संजय तडाखे या वेळी उपस्थित होते.
आमदार चव्हाण म्हणाले, ‘‘कऱ्हाड दक्षिणमध्ये कोट्यवधींची विकासकामे केली; पण गेली साडेसात वर्षे भाजपचे सरकार असल्याने मतदारसंघात विकासनिधी आणण्यात अनेक अडथळे आले, तरीही अडीच वर्षांच्या सत्ता काळात आणि प्रशासनातील कामकाजाची माहिती म्हणून कोट्यवधींचा निधी पुन्हा एकदा कऱ्हाड दक्षिणसाठी आणता आला. लोकसभेच्या निवडणुकीत खोके सरकारचा जनतेने पराभव केला.
त्याची पुनरावृत्ती विधानसभेत होणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर कऱ्हाड दक्षिणेचा विकास पुन्हा त्याच जोमाने होईल. कृष्णाकाठी काँग्रेसमुळेच विकासाच्या योजना उभ्या राहिल्या.
तुम्ही केवळ आमदार निवडत नाही, तर सरकार निवडण्याची ही निवडणूक आहे. फुले, शाहू व आंबेडकर यांच्या विचारांचे सरकार आणायचे, की पुन्हा वर्ण व्यवस्था आणणाऱ्या प्रवृत्तींना आपण बळ द्यायचे, हे मतदारांनी ठरवावे.’’
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.