Sangram Jagtap visit Nagar Collector Office : माजी सरपंचाचा अपघाती मृत्यू; आमदार जगतापांनी गाठले जिल्हाधिकारी कार्यालय

Accident on the Highway : शहापूर गावाचे माजी सरपंच बापू बेरड याच रस्त्यावर अपघाती मृत्यू झाला. रस्त्यावरील खड्डे चुकवण्याच्या नादात हा बापू बेरड यांच्या वाहनाला अपघात झाल्याचे सांगितले जाते.
Sangram Jagtap Vist Nagar Collector Office
Sangram Jagtap Vist Nagar Collector Officesarkarnama
Published on
Updated on

Nagar : रस्त्यात पडलेला खड्डा चुकवण्याच्या नादात भिंगारमधील महामार्गावर माजी सरपंचाच्या गाडीला अपघात झाला. या अपघातामध्ये माजी सरपंचाचा मृत्यू झाला. या अपघातानंतर भिंगार शहरासह शहापूर, केकती, सैनिकनगर, नागरदेवळे भागातील ग्रामस्थ आक्रमक झाले. आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठत थेट जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना सुनावले. रस्त्यावरील खड्डे न बुजवल्यास 10 फेब्रुवारीला स्टेट बँक चौकात रास्ता रोको आंदोलन करू, असा इशारा आमदार जगताप यांनी दिला.(Sangram Jagtap Vist Nagar Collector Office)

Sangram Jagtap Vist Nagar Collector Office
Lok Sabha Election 2024 : अबकी बार 400 पार..! टीका करताना खर्गे हे काय बोलून गेले? मोदींनाही हसू आवरेना...

भिंगार शहरातून महामार्ग कल्याण विशाखापट्टण राष्ट्रीय महामार्ग जातो. हा रस्ता खड्ड्यांमुळे चाळण झाला आहे. आज (शुक्रवारी) सकाळी शहापूर (ता. नगर) गावाचे माजी सरपंच बापू बेरड याच रस्त्यावर अपघाती मृत्यू झाला. रस्त्यावरील खड्डे चुकवण्याच्या नादात बापू बेरड यांच्या वाहनाला अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. या अपघातानंतर भिंगार शहरासह शहापूर, केकती, सैनिकनगर, नागरदेवळे भागातील ग्रामस्थ आक्रमक झाले. हा अपघात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झाल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. तिथे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची भेट घेत महामार्गाचे अभियंत्याविरोधात कारवाईची मागणी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी या अपघाताची माहिती मिळताच त्यांनी देखील जिल्हाधिकारी कार्यालय(Collector Office) गाठले. आमदार जगताप ग्रामस्थांबरोबर प्रशासनाविरोधात आक्रमक झाले. रस्त्यावरील खड्डे आठ दिवसांत न बुजवल्यास 10 फेब्रुवारीला स्टेट बँक चौकात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा आमदार जगताप यांनी दिला. माजी उपमहापौर गणेश भोसले, राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता तारडे, संजय सपकाळ, कृष्णा बेरड, सुधीर लांडगे, गजानन भांडवलकर उपस्थित होते.

रस्त्याचे काम अपूर्ण

कल्याण राष्ट्रीय महामार्गाचे काम ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे पूर्ण होवू शकलेले नाही. त्यामुळे नेप्ती बायपास चौक ते नेप्ती नाका आणि स्टेट बँक चौक ते चांदबीबी महालापर्यंतचा महामार्गावर तीन वर्षापासून खड्डेमय झाला आहे. या खड्ड्यांमुळे आतापर्यंत तीन जणांचा बळी गेला आहे. अनेक जणांना अपघात होऊन जायबंदी झाले आहेत. ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना रस्त्यावरील खड्डे आणि अपघाताची छायाचित्र मोबाईलवर दाखवले. यानंतर जिल्हाधिकारी सालीमठ यांनी अभियंता तारडे यांना बोलावून घेत खड्डे तत्काळ बुजवण्याचा आदेश दिला.

(Edited By Roshan More)

Sangram Jagtap Vist Nagar Collector Office
Congress Leader Baba Siddique: चौकशीच्या ससेमिऱ्याने मुंबईतील काँग्रेस नेत्याचे गळाले 'ग्लॅमर'..!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com