Prithviraj Chavan : माजी मुख्यमंत्री एवढे शांत आहेत आणि त्यांच्यासमोर दोनवेळा पडलेला समोरचा उमेदवार पैशाच्या जोरावर एवढ्या उड्या मारतोच कसा? तीन वेळा पडून सुद्धा एवढा पैसा त्यांच्याकडून येतो कोठून? असा सवाल शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला.
कऱ्हाड दक्षिण मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारार्थ येथे झालेल्या महिला मेळाव्यात अंधारे बोलत होत्या. आमदार पृथ्वीराज चव्हाण, सत्वशिला चव्हाण, कर्नाटकचे माजी मंत्री विनयकुमार सोरके, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, प्रा. धनाजी काटकर, माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, अर्चना पाटील, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, तालुकाध्यक्षा विद्याताई थोरवडे, गीतांजली थोरात, मलकापूरच्या माजी नगराध्यक्षा नीलम येडगे, रेठरे बुद्रुकच्या अर्चना अविनाश मोहिते उपस्थित होत्या.
अंधारे म्हणाल्या, ‘‘कमळ दलदलीत उगवते. मात्र, कऱ्हाडचा भाग सखल असल्याने इथे कधीच कमळ उगवलेले नाही. कऱ्हाडची संस्कृती हलवू द्यायची नाही. हाताला साथ देऊन पृथ्वीराज चव्हाणांसारखे सोज्वळ नेतृत्व जपा. दक्षिणची जनता पृथ्वीराज चव्हाण यांच्या रूपाने राज्याचे नेतृत्व निवडत आहे.
एकीकडे महाविकास आघाडी विकासाचे बोलत आहे. दुसरीकडे महायुतीचे नेते मतदारांना धमकावत आहेत. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांना धमकी दिली. त्याचा नीट विचार करा.
महाडिक किंवा भाजपच्या नेत्यांनी बापजाद्यांची जमीन विकून महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे दिले आहेत, की त्यासाठी एकनाथ शिंदे यांनी तापोळ्याची जमीन विकली आहे. ते सरकारी योजनेवर मिरासदारी करत आहेत. महायुती महिलांना मतांचे आमिष दाखवण्यासाठी योजना राबवत आहेत का? असेच वाटत आहे.’’
प्रत्येक महिलेच्या लग्नाच्या मंडपात व स्वागत कमानीवर तिच्या घरच्यांनी कधी पोस्टर लावले का? आपल्या भावांनीही ते कधी केले नाही. भावाने बहिणीला दहा, पाच हजार दिले म्हणून पोस्टर लावला का? कारण तेथे त्यांना बहिणीच्या नात्याची मर्यादा कळली होती.
बहिणीच्या गरिबीची टिंगल त्यांनी केली नाही; पण महायुती सरकारने लाडक्या बहिणीच्या १५०० रुपयांसाठी २० लाख रुपयांचे पोस्टर्स लावले असल्याचाही चिमटाही अंधारे यांनी काढला.
यावेळी माजी मंत्री विनयकुमार सोरके, शारदा जाधव, अर्चना मोहिते, वैशाली जाधव यांची भाषणे झाली. विद्याताई थोरवडे यांनी प्रास्ताविक केले. गीतांजली थोरात यांनी आभार मानले.
पराभवानंतर आठवली ‘लाडकी बहीण’
लाडकी बहीण योजनेचे विधानसभेतील भाषणात स्वागतच केले होते; पण त्यामध्ये महत्त्वाचे बदल सुचवणे आवश्यक होते. ते सुचविले आणि त्यानुसार सरकारने बदल केले. त्याचा राज्यातील जनतेला फायदा झालाच. कर्नाटकातील आमच्या काँग्रेसच्या सरकारने ही योजना आधीच सुरू केली आहे. राज्यातील महायुती सरकारला लोकसभेतील पराभवानंतर लाडकी बहीण योजना आठवली, असा टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.