Makarand Patil: तुमचे योगदान एकदा जनतेला कळू द्याच !

Makarand Patil: विरोधकांनी आपल्या तालुक्यातील संस्थांची वाट लावत पापे केली, मकरंद पाटील यांचा घणाघात
Wai Assembly
Wai AssemblySarkarnama
Published on
Updated on

Makarand Patil: आम्ही मागील १५ वर्षांपासून रात्रंदिवस तिन्ही तालुक्यांसाठी राबतोय, तुमचं समाजासाठी एका रुपयाचं योगदान नाही. त्‍यामुळे तुम्ही तिन्ही तालुक्यांसाठी काय योगदान दिले, ते एकदा जनतेला कळूद्याच, असे आवाहन आमदार मकरंद पाटील यांनी केले.

बावधन गटातील कणूर येथील प्रचार सभेत महायुतीतील राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्‍हणून ते बोलत होते.

यावेळी किसन वीर कारखान्‍याचे संचालक दिलीप पिसाळ, माजी सभापती मदन भोसले, सरपंच निखिल राजपुरे, माजी सरपंच हणमंत पवार, प्रवीण मतकर, भानुदास राजपुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ‘‘आत्ता जे समोर उभे आहेत, ते कोविड काळात कुठे होते, हे त्यांना विचारा. महाबळेश्वरमधील अतिपावसामुळे शेतकऱ्यांच्या जमिनींचे नुकसान झाले. त्‍यावेळी त्‍यांच्‍या पाठीशी खंबीर उभा राहिलो.’’ बंद पडलेली सूतगिरणी मी आणि खासदार नितीन पाटील यांनी पुढाकार घेऊन सुरू केली, असेही श्री. पाटील यांनी स्‍पष्‍ट केले. शामराव राजपुरे, साक्षी महांगडे, निखिल राजपुरे यांनीही यावेळी मनोगत व्‍यक्‍त केले.

Wai Assembly
Prabhakar Gharge: उरमोडीचे पाणी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या काळातच

विरोधकांचे पाप मी फेडतोय

विरोधकांनी आपल्या तालुक्यातील संस्थांची वाट लावत पापे केली. त्यांच्या पापाचे भोग मी निस्तरतोय. त्यांनी वाट लावलेल्‍या संस्था आम्ही दुरुस्त करत आहोत, असा घणाघात आमदार मकरंद पाटील यांनी बावधन गटातील अनपटवाडी येथील प्रचार सभेत केला.

यावेळी मराठा महासंघाचे जिल्‍हाध्‍यक्ष विक्रम वाघ, सरपंच अमृता गोळे, अश्विनी मांढरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तानाजी कचरे, सतीश कांबळे, संतोष राजेभोसले, नागनाथ भोसले, अजित पिसाळ, पोपट पिसाळ, अनिल अनपट, नितीन मांढरे, वसंत अनपट आदी उपस्थित होते.

अनपटवाडीने मला एकतर्फी मतदान करून माझ्यावर प्रेम केलंय. मी कधीच मताचा विचार करत नाही. गावांच्‍या मागणीनुसार मी विकासकामे करत असतो. बावधन गणात २०० कोटींच्या वर विकासकामे केली असल्‍याचेही श्री. पाटील यांनी स्‍पष्‍ट केले. नितीन मांढरे यांनीही मनोगत व्‍यक्‍त केले. सचिन अनपट यांनी प्रास्‍ताविक केले. अनिल अनपट यांनी आभार मानले.

Wai Assembly
Anuradha Nagawade यांचा Congress ला रामराम? |BJP|NCP|Maharashtra Assembly Elections 2024 |Sarkarnama

बंद संस्‍था सुरू केल्‍या

विरोधक म्हणतात, की आम्ही कोणती संस्था उभारली नाही; पण तुम्ही बंद पाडलेल्या संस्था आम्ही पुन्हा सुरू केल्‍या. तुम्ही ज्या संस्थांचे वाटोळे केले, त्या संस्था आम्ही वाचविल्या असल्‍याचा हल्‍लाबोल आमदार मकरंद पाटील यांनी व्‍याजवाडीत केला.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रोहिदास पिसाळ, राजेश पिसाळ, ओबीसी तालुकाध्यक्ष अरविंद कुदळे, मनीषा फरांदे, अप्पासाहेब पिसाळ, दिलीप पिसाळ, सतीश पिसाळ, दिनकर पिसाळ, विठ्ठल पिसाळ, संजय पिसाळ, सुनील निंबाळकर, प्रकाश निंबाळकर, पांडुरंग सपकाळ, अशोक पिसाळ, रामदास पिसाळ, संपत मालुसरे आदी उपस्‍थित होते. यानंतर रोहिदास पिसाळ, विक्रम पाटील आदींनी मनोगत व्‍यक्‍त केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com