Patan : लोटे एमआयडीसीतील कंपन्या कोणी चोरल्या : मंत्री देसाईंचा भास्कर जाधवांना सवाल

Bhaskar Jadhav १५ वर्षांत वेगवेगळ्या पक्षात उड्या मारून पक्षनिष्ठा काय असते, ते वाचाळवीर भास्कर जाधव आम्हाला आमच्या तालुक्यात येऊन शिकवत आहेत.
Bhaskar Jadhav, Shambhuraj Desai
Bhaskar Jadhav, Shambhuraj Desaisarkarnama
Published on
Updated on

Patan News : लोटे औद्योगिक वसाहतीमधील कंपन्या कोणी चोरल्या, याची सविस्तर माहिती माझ्याकडे आहे आणि याचा नेमका चोर कोण आहे, हेही मी वेळ आल्यानंतर जनतेसमोर जाहीर करणार असून, त्यानंतर महाराष्ट्रातील जनतेला कळणार आहे, की चोर कोण आहे. मग दूध का दूध, पाणी का पाणी होणार असल्याचा टोला पालकमंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai यांनी आमदार भास्‍कर जाधव Bhaskar Jadhav यांना लगावला आहे.

मंत्री शंभूराज देसाई पत्रकारांशी बोलताना म्हणाले, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाबरोबर जायचे कधीही मान्य नव्हते, असे असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मांडीवर जाऊन कोण बसले आहे, हे राज्यातील जनतेला सर्वज्ञात आहे. एवढेच नव्हे तर तो पक्ष आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दावणीला बांधला आहे.

गत १५ वर्षांत वेगवेगळ्या पक्षात उड्या मारून पक्षनिष्ठा काय असते, ते वाचाळवीर भास्कर जाधव आम्हाला आमच्या तालुक्यात येऊन शिकवत आहेत. आदित्य ठाकरे यांच्या आवाजाबद्दल कुचेष्टा करून त्यावर वासरू, अशी टीका केली होती, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. आम्ही उठाव केला म्हणून हे वाचळवीर शिल्लक सेनेचे नेते झाले. नेते झाले, की यांच्याच डोक्यात नेतेपदाची हवा गेली आणि त्यांची काहीही वायफळ बडबड करणं सुरू आहे.

Bhaskar Jadhav, Shambhuraj Desai
Shambhuraj Desai : 'शहाजीबापूंचं घर त्यांच्या डोळ्यात खुपतंय, अंधारेंना कावीळ झालाय!'

मतदारसंघात झालेल्या विकासकामांच्या जोरावरच आम्ही नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये मोठे यश मिळवले आहे. त्यामुळे शिल्लक सेनेला व राष्ट्रवादी काँग्रेसला पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेने त्यांची जागा दाखवली आहे. लोटे औद्योगिक वसाहतीमधील कंपन्या कोणी चोरल्या, याची सविस्तर माहिती माझ्याकडे आहे आणि नेमका याचा चोर कोण आहे. या चोरांचा बोलविता धनी कोण आहे, हेही मी वेळ आल्यानंतर जनतेसमोर जाहीर करणार आहे. आम्हाला लोकनेते बाळासाहेब देसाई यांची शिकवण आहे. नाही तर त्यांच्याच भाषेत आम्हीही उत्तरे दिली असती, इशारा त्यांनी दिला आहे.

Bhaskar Jadhav, Shambhuraj Desai
Bhaskar Jadhav : सीमावाद प्रश्नी भास्कर जाधवांनी देसाईंना डिवचलं : म्हणाले, शंभू देसाईंचा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com