राष्ट्रवादीबाबत पटोलेंची सोनिया गांधींकडे तक्रार... अजितदादा म्हणतात, ‘फार महत्व द्यायचं कारण नाही!’

नाना पटोले यांनी त्यांच्या नेत्यांना काय सांगायचं, हा त्यांचा अधिकार आहे.
Nana Patole- Ajit Pawar
Nana Patole- Ajit Pawar Sarkarnama

कराड : ठीक आहे ना, नाना पटोले (Nana Patole) यांनी त्यांच्या नेत्यांना काय सांगायचं, हा त्यांचा अधिकार आहे. त्याला आम्ही फार महत्व द्यायचं कारण नाही, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षाच्या हायकमांडकडे राष्ट्रवादीबाबत केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्याचा पवित्रा घेतला (Patole's complaint to Sonia Gandhi about NCP... Ajitdada says, "no reason to give importance!')

भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत हातमिळवणी केली. त्यामुळे काँग्रेसला अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपयशाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी धर्माचं पालन करत नाही, अशी तक्रार नाना पटोले यांनी सोनिया गांधींकडे केली आहे. त्यावर कराडमधील पत्रकार परिषदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर अजित पवार यांनी वरील उत्तर दिले.

Nana Patole- Ajit Pawar
‘आमदार भारसाकळे, मिटकरीसाहेब त्या प्रकल्पांचेही श्रेय तुम्हीच घ्या’

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, नाना पटोले यांनी त्यांच्या नेत्यांना काय सांगावं, हा त्यांचा अधिकार आहे. आमच्याही पक्षात काही झालं तर आम्हीही कधी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करतो, तर कधी पवारसाहेबांकडे तक्रार करत असतो. हे चालत असतं. आपल्या देशाने २४ पक्षाचं एनडीए सरकार बघितलं आहे. अनेक पक्षाचं यूपीए सरकारही आपण पाहिलेले आहे. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं आघाडीचं सरकार १५ वर्षे होतं. त्याही वेळी भांड्याला भांडं लागायचं. एकाच कुटुंबात भांड्याला भांडं लागतं, इथं तर तीन पक्षात लागणारच ना. भांड्याला भांडं लागू नये; म्हणून आम्ही तीनही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. लक्ष दिलं पाहिजे. नीटपणे सरकार चालवलं पाहिजे.

Nana Patole- Ajit Pawar
बाबांनो, मी खूप अनुभवलंय...तोलून मापून बोला : अजितदादांचा कार्यकर्त्यांना सल्ला

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाबाबत अजित पवार म्हणाले की, फडणवीस यांच्या मनात काय आहे, ते मला काही माहीत नाही. देशाचा, राज्याच्या विकासाचा विचार आज सर्वांनी करण्याची आवश्यकता आहे. सध्या राजकारणातील सुसंस्कृतपणा कमी होत आहे. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो विचार आपल्या सर्वांना दिला, जो रस्ता त्यांनी आपल्याला दाखवला, त्या मार्गावरून सर्वांनी वाटचाल केली पाहिजे. पण, त्या विचारापासून सध्या आपण भरकटत चाललो आहे. ते काही बरोबर नाही. एखाद्यानं उद्या काही केलं, तर काहींनी समंजस भूमिका घेतली पाहिजे. कारण, टाळी एका हाताने वाजत नसते. दोन्ही हाताने ती वाजत असते, हेही आपण लक्षात घेतले पाहिजे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com