Rajan Patil News : राजन पाटलांच्या लोकनेते परिवाराच्या फलकावर पुन्हा झळकले पवार कुटुंबीय!

भीमा सहकारी साखर कारखान्या निवडणुकीदरम्यान मध्यंतरी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांचे फोटो गायब झाले होते.
LokNete ParivarBanner
LokNete ParivarBannerSarkarnama
Published on
Updated on

मोहोळ (जि. सोलापूर) : मोहोळ तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांच्या फलकावर ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar), माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) झळकले. त्यामुळे या फलकाची चर्चा आता नव्याने चांगलीच रंगू लागली आहे. कारण, भीमा कारखान्याच्या निवडणुकीत लोकनेते परिवाराच्या फलकावरून पवार गायब झाले हेाते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील व माजी आमदार राजन पाटील यांच्यात गेल्या वर्षभरापासून राजकीय कलगीतुरा सुरू आहे. राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी हा वाद राज्याच्या कानाकोपऱ्यात गेला आहे. हाच वाद राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही दरबारात गेला होता. दोघांनाही समजावण्याचा प्रयत्न या वरिष्ठ नेत्यांनी केला. त्यानंतर माजी आमदार राजन पाटील यांच्यावर होणारी टीका काही काळ थांबली.

LokNete ParivarBanner
Pandharpur Corridor संदर्भात अफवा पसरविणाऱ्यांना फडणवीसांनी हात जोडून केली विनंती; म्हणाले ‘मंदिरं अन मठ...’

दरम्यानच्या काळात मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. तालुक्यातील एक सहकारी संस्था व शेतकऱ्याचे मंदिर उद्ध्वस्त होऊ नये, यासाठी विकास हया मुद्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील, पंढरपूरच्या विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील, माजी उपसभापती मानाजी माने, प्रदेश सरचिटणीस रमेश बारसकर, विठ्ठलचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांच्यासह अन्य नेत्यांची मोट बांधून भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी प्रचारात सामावून घेतले. प्रचारादरम्यान उमेश पाटील यांनी पुन्हा माजी आमदार पाटील यांच्यावर टीकेची झोड उडवली होती.

LokNete ParivarBanner
Soapur News : 'समृद्धी'चा कार्यक्रम संपवला अन्‌ जेवणही न करता तुमच्या दर्शनासाठी सोलापुरात आलो

त्यावेळी लोकनेते परिवाराच्या फलकावरून खासदार शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री पवार, खासदार सुप्रिया सुळे यांचे फोटो गायब झाले होते. त्याच दरम्यान पवार हे सोलापूरला येणार होते. त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी फलक लावण्यात आले होते. स्वागताचे फलक ही अज्ञातांनी फाडले होते. हाच धागा धरून प्रदेश प्रवक्ते पाटील यांनी फलक फाडले व फलकावरून पवार कुटुंबीयांचे फोटो गायब झाल्याबद्दल माजी आमदार पाटील यांच्यावर टीकेची झोड उडवत आकांडतांडव एक केले होते. त्याच काळात माजी आमदार पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला तालुक्यात ऊत आला होता.

LokNete ParivarBanner
Gurav Samaj Convention : गुरव समाजासाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा : संत काशिबा विकास योजनेची केली सुरुवात

दरम्यान, शनिवारी रात्री मोहोळ येथील शिवाजी चौकात उंचावर असणाऱ्या लोकनेते परिवाराच्या फलकावर खासदार पवार, उपमुख्यमंत्री पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहित पवार यांचे फोटो पुन्हा झळकले आहेत. सोमवारी खासदार पवार यांचा वाढदिवस आहे. त्या फलकाच्या माध्यमातून पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे भविष्यात तालुक्याची राजकीय समीकरणे काय असणार आहेत, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com