Raju Shetty Warning : उसाचा दुसरा हप्ता 400 चा द्या, अन्यथा धुरांडी पेटणार नाही; राजू शेट्टींचा सरकारला थेट इशारा

Sugar Factory Politics : भविष्यातही उसापासून तयार होणाऱ्या साखरेला व उपपदार्थांना चांगले दिवस येणार असून, त्यातून कारखानदारांना पैसा मिळेल.
 Sugar Factory Politics :
Sugar Factory Politics :Sarkarnama
Published on
Updated on

Sangali Political News : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील साखर कारखानदारांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसदराच्या दुसऱ्या हप्तापोटी प्रतिटन 400 रुपये द्यावेत, या मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रादेशिक सहसंचालक कार्यालयावर आसूड मोर्चा काढण्यात आला. कारखानदारांनी त्वरित 400 चा हप्ता द्यावा, अन्यथा कारखान्याची धुरांडी पेटू देणार नाही. असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी मोर्चावेळी दिला. कोल्हापुरातील ताराराणी चौक ते मार्केट यार्डमधील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला.

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील साखर कारखान्यांची रिकव्हरी पुणे जिल्ह्यातील कारखान्यांपेक्षा जादा आहे. त्यामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील कारखान्यांना दुसरा हप्ता प्रतिटन 400 रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देणे सहज शक्य आहे.

 Sugar Factory Politics :
Omraje Nimbalkar News : 'हे' ट्रिपल इंजिनचे सरकार बघा, मराठा आरक्षण किती गांभीर्याने घेतंय; ‘त्या’ व्हिडिओवरून ओमराजे संतापले...

भविष्यातही उसापासून तयार होणाऱ्या साखरेला व उपपदार्थांना चांगले दिवस येणार असून, त्यातून कारखानदारांना पैसा मिळेल. अशावेळी शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा झाला पाहिजे. वाढलेली महागाई, गगनाला भिडलेले औषधं, बी बियाणे आणि खात्यांचे वाढते दर यामुळे उत्पादन खर्चात बेहिशेबी वाढ झालेली आहे. त्याचा परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक बाबींवर होत आहे. त्यामुळे साखर कारखानदाराने तातडीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दुसरा हप्ता प्रतिटन 400 रुपये जमा करावा, या मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एल्गार पुकारण्यात आला आहे.

कोल्हापुरातील ताराराणी चौक ते मार्केट यार्डमधील प्रादेशिक सहसंचालक साखर कारखान्यावर हा आसूड मोर्चा काढण्यात आला. या वेळी राज्य सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत हा मोर्चा कार्यालयाकडे निघाला. या मागणीबरोबरच सर्व कारखानदारांचे वजन काटे डिजिटल करावेत, अशी मागणी केली आहे.

कारखानदारांकडून ऊसतोडणी मजूर व वाहतूकदार यांचीही लुबाडणूक सुरू आहे. जोपर्यंत साखर कारखान्यांचे वजन काटे ऑनलाइन व डिजिटल होत नाहीत, तोपर्यंत साखर कारखान्यास काळप परवाना देऊ नये, अशी मागणी ही या मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. वरील मागण्यांवर योग्य कारवाई झाली नाही, तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा राज्यभर भडका उडेल, असा इशारा या मोर्चाच्या दरम्यान देण्यात आला.

Edited By- Anuradha Dhawade

 Sugar Factory Politics :
Patole on Bhondekar : `त्या’ दुर्घटनेसाठी आयोजकांवर ताबडतोब गुन्हे दाखल करा; नाना पटोले झाले आक्रमक !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com