Omraje Nimbalkar News : 'हे' ट्रिपल इंजिनचे सरकार बघा, मराठा आरक्षण किती गांभीर्याने घेतंय; ‘त्या’ व्हिडिओवरून ओमराजे संतापले...

Maratha Reservation : आरक्षण देण्याची दानत नसेल तर तसे सांगा, पण किमान जखमेवर मीठ तरी चोळू नका.
Maratha Reservation
Maratha Reservation Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : मराठा आरक्षणावरील सर्वपक्षीय बैठकीची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. शिंदे-फडणवीस-पवार यांच्यावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सरकारला सुनावले आहे. "आरक्षण देण्याची दानत नसेल तर तसे सांगा," असे खडेबोल ओमराजेंनी सरकारला सुनावले आहे.

Maratha Reservation
Eknath Khadse News : एकनाथ खडसेंचा मतदारसंघ ठरला; रावेरमधून सुने विरोधात मैदानात...

हा व्हिडिओ ओमराजेंनी टि्वट केला आहे. "मराठा आरक्षणासाठी सर्व समाज बांधव पोटतिडकीने राज्यभर आंदोलन करीत आहेत. अनेकांनी अन्नत्याग केला आहे. विविध माध्यमातून राज्य सरकारला जागे करण्याचा प्रयत्न आपला मराठा तरुण करताना दिसतो. तरीही हे सरकार केवळ वेळकाढूपणा करीत आहे. एकीकडे समाज जीवन मरणाचा संघर्ष शांततेच्या माध्यमातून करीत असताना सरकारचे हे ट्रिपल इंजिन बघा किती गांभीर्याने हा विषय घेत आहेत. आरक्षण देण्याची दानत नसेल तर तसे सांगा, पण किमान जखमेवर मीठ तरी चोळू नका, समाज आता तुमच्याकडे डोळसपणे बघतोय," असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.

पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्री आणि दोन उपमु्ख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या संवादाच्या व्हिडिओमध्ये ‘आपण बोलून मोकळं व्हायचं फक्त आणि निघून जायचं,’ असे बोलताना शिंदे दिसत आहेत. त्याला ‘हो, येस,’ म्हणून अजित पवार यांनी दुजोरा दिला आहे, तर देवेंद्र फडणवीस यांनी समोरील माइक सुरू असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांना सावध केल्याचे या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

Edited By : Mangesh Mahale

Maratha Reservation
Manoj Jarange News : मराठा समाजाने वेळ दिला, आता सरकारची कसोटी; आंदोलन संपण्याचा प्रश्नच नाही!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com