Karnataka Election Result : कर्नाटक निवडणुकीत जनतेने भाजपला भीक घातली नाही....पृथ्वीराज चव्हाण

Congress कर्नाटकात काय निकाल लागणार याची मोठी होती. मात्र, सत्ताधारी भाजपला सत्तेतून पाय उतार व्हावे लागत आहेत. कर्नाटकमध्ये काँग्रेस स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करत आहे.
Prithviraj Chavan
Prithviraj Chavansarkarnama
Published on
Updated on

Karnataka Election Result : कर्नाटक निवडणुकीत धार्मिक मुद्दे घेत भाजपने प्रचार केला. बजरंगीबली प्रचार केला. त्याला जनतेने भीक घातली नाही. काँग्रेसचा विकासाचा मुद्दा महत्त्वाचा ठरला आहे,अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan यांनी केली आहे.

कर्नाटक निवडणुकीचा Karnataka election निकाल काय लागणार याची उत्सुकता होती. येथे सत्ताधारी भाजपला सत्तेतून पाय उतार व्हावे लागत आहेत. कर्नाटकमध्ये काँग्रेस स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करत आहे. यासंदर्भात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, या निवडणुकीत जनता दल (एस)ची पाच टक्के मते घटली. त्याचा फायदा थेट काँग्रेसला झाला आहे. धार्मिक मुद्दे घेत भाजपने प्रचार केला. बजरंगीबली प्रचार केला. त्याला जनतेने भीक घातली नाही. काँग्रेसचा विकासाचा मुद्दा महत्त्वाचा ठरला आहे.

Prithviraj Chavan
Satara News : ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा उद्या शुभारंभ; शिंदे-फडणवीस पाटणला येणार

भाजपला अंतर्गत वाद आणि बाहेरील नेते यांना जास्त ताकद देणे यामुळे लिंगायत समाज नाराज. बाहेरुन चेहरा आणला तो किती प्रभावी ठरेल हे पाहावे लागेल. कर्नाटकात स्थानिक नेतृत्व दिले त्याचा फायदा झाला आहे. बाहेरील नेते लादले तर फटाक बसतो. स्थानिक नेतृत्त्व दिले पाहिजे हे पुन्हा सिद्ध झाले आहे, असे चव्हाण म्हणाले.

Prithviraj Chavan
Phaltan News : रामराजेंना दिल्लीला पाठविण्यासाठी सर्वांची साथ हवी : अजित पवार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com