Shivsena News : जनतेने उद्धव ठाकरे शिवसेनेवर विश्वास दाखवावा... डॉ. नीलम गोऱ्हे

Nilam Gorhe उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी आज सकाळी श्री क्षेत्र गोंदवले येथील ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.
Nilam Gorhe in Gondavale
Nilam Gorhe in Gondavalesarkarnama
Published on
Updated on

-फिरोज तांबोळी

Maan News : श्री क्षेत्र गोंदवले तीर्थक्षेत्राच्या विकासासंदर्भात या आधीच पर्यटन विभाग आणि संबंधित मंत्र्यांशी बोलणे झाले आहे. ग्रामस्थांनी याभागाच्या विकासाकरिता सविस्तर कृती आराखडा तयार करून सादर करावा. या भागाच्या विकासासाठी उद्धव ठाकरे Udhav Thackeray, आदित्य ठाकरे Aditya Thackeray, पक्षाचे जिल्हाप्रमुख, शिवसैनिक यांच्यावरती जनतेने विश्वास दाखवला तर, तो आम्ही सार्थ करून दाखवू, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे Nilam Gorhe यांनी व्यक्त केले.

सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी आज सकाळी माण तालुक्यातील श्री क्षेत्र गोंदवले येथील ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी, नुकत्याच झालेल्या ‘अर्थसंकल्पीय अधिवेशनात केलेल्या कामकाजाचा अहवाल’ ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराजांच्या चरणी अर्पण केला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, श्री क्षेत्र गोंदवले महाराज संस्थानच्या कामातून मला नेहमीच स्फूर्ती मिळते. या ठिकाणी येण्याची जी प्रेरणा आहे. ती याभागातील अनेक नागरिक चांगले काम करत आहेत. त्यांना ताकद देण्यासाठी आणि या भागात आणखीन जलसंधारणाची कामे करण्यासाठी हा दौरा करण्यात आला आहे.

Nilam Gorhe in Gondavale
Nilam Gorhe News : नवे महिला धोरणात अंमलबजावणी करणारे कायदे असावेत..

  या दौऱ्यात महिलाविषयक प्रश्न, जलसंधारण, देवस्थानचा विकास, पर्यटन, सार्वजनिक शौचालय यासंह इतर प्रश्नांबाबत प्रशासकीय अधिकारी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, सरपंच, ग्रामस्थ यांसोबत बैठका घेऊन त्यावर उपाय योजना करण्यात येणार असल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले.

Nilam Gorhe in Gondavale
Satara News : २०२४ ला पुन्हा भाजपचीच सत्ता येणार; माझ्यासहित चौघे आमदार होणार...

  दरम्यान, गोंदवल्याचे सरपंच जयप्रकाश कट्टे, सदस्य पंकज पाटील, माजी सरपंच गुलाबराव कट्टे व ग्रामस्थांनी डॉ. गोऱ्हे यांची भेट घेऊन गावाच्या विकासाकामांबाबत चर्चा केली. माण तालुक्यातील बिजवडी ग्रामस्थांनी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचा सत्कार केला. यावेळी बिजवडी गावाच्या विकासासाठी डॉ. गोऱ्हे यांनी तात्काळ दहा लाख रुपयांचा विकासनिधी जाहीर केला.

Nilam Gorhe in Gondavale
Shivsena News; उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com