

Phaltan Doctor Case: फलटणमधील डॉक्टर महिलेच्या आत्महत्येने तालुक्याच्या सांस्कृतिक इतिहासाला गालबोट लागले आहे. या प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा होणार असून, नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी समिती नेमलेली आहे. यातून सत्य काय ते बाहेर येईल, असे आमदार सचिन पाटील यांनी सांगितले. फलटण येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार पाटील बोलत होते.
पाटील म्हणाले, ‘‘या घटनेच्या आडून विरोधकांनी फलटणचे नाव बदनाम केले आहे. त्यांनी विकासकामावर बोलले पाहिजे. तालुक्याचा विकास माजी खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांच्यामुळे झाला आहे.’’ तालुक्यात कोट्यवधीची विकासकामे झालेली आहेत. रस्ते, नीरा- देवघर प्रकल्प पाणी योजनेमुळे पूर्ण फलटण तालुका १०० टक्के सिंचनाखाली येणार आहे. शहरातील अंतर्गत रस्ते नव्याने होणार आहेत.
नाईक बोमवाडी येथे नवीन एमआयडीसी प्रकल्पामुळे तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. विरोधकांनी आम्हाला विकासासाठी मार्गदर्शन करावे. चुकीच्या पद्धतीने राजकारण करू नये. येणाऱ्या निवडणुकीत जनता यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असेही आमदार पाटील यांनी सांगितले. फलटण तालुक्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या महायुती म्हणून एकत्रित एकत्रितपणे लढवणार असल्याचे आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले.
माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर विरोधकांनी चुकीच्या पद्धतीने आरोप केले आहेत. याला उत्तर देण्यासाठी सोमवारी गजानन चौक येथे जाहीर संवाद साधला जाणार आहे. यावेळी ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचे असतील त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही माजी नगरसेवक अशोक जाधव यांनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.