Pune Graduates Election : आधी उमेदवाराची घोषणा; मग लगेच युटर्न : पुणे पदवीधरवरून चंद्रकांतदादा टीकेचे धनी

Pune Graduates Election: पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवाराच्या घोषणेवरुन दिवसभर चर्चा रंगलेली असताना आता चंद्रकांत पाटील यांनी आपल्या विधानाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर : पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवाराच्या घोषणेवरुन दिवसभर चर्चा रंगलेली असताना आता चंद्रकांत पाटील यांनी आपल्या विधानाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच अरुण लाड यांनी हसन मुश्रीफ यांना काय शब्द दिला? याच्याशी माझ्या पक्षाचा संबंध नाही, अशा शब्दांत त्यांनी सारवासारव करण्याचाही प्रयत्न केला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, मी काही शरद लाड यांची उमेदवारी घोषित केलेली नाही. मी सांगलीत भाषणात म्हणालो की, शरद लाड हे पदवीधरचे उमेदवार असू शकतात. आमच्याकडे उमेदवारी घोषित करण्यासाठी समिती असते. मला उमेदवार घोषित करण्याचा अधिकार नाही. अरुण लाड यांनी हसन मुश्रीफ यांना काय शब्द दिला? याच्याशी माझ्या पक्षाचा संबंध नाही.

भाजपत दररोज इन्कमिंग सुरू झाली आहे. 2014 साला नंतर अडीच वर्षे सत्ता नसताना देखील कुणी पक्ष सोडून गेले नाहीत. कारण देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यांना प्रेमाने बांधून ठेवलं. राज्यात आम्ही एक नंबरला आहोत, एक नंबर आणि दोन नंबरमध्ये मोठा फरक आहे. दर मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश होत राहणार आहेत, अशा शब्दांत यावेळी चंद्रकांत पाटील यांनी भाजपतील इन्कमिंगवर भाष्य केलं.

दरम्यान, सांगली, कोल्हापूर पालिकेतील संख्याबळाबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, सांगली आणि कोल्हापूरमध्ये आमची जी फिगर आहे तितक्या जागा आम्ही घेणार, त्याच्या खाली आम्ही येणार नाही. जे उमेदवार विजयी होतील, त्यांचा तसा सर्व्हे आला तर उमेदवार निवडण्याचे समिती ठरवते. कोल्हापूर महापालिका निवडणुकीत आम्ही 33 जागेच्या खाली येणार नाही. 33 पेक्षा जास्त जागा आम्ही घेणार, जागेवर अदलाबदली होऊ शकते. पालिका, जिल्हा परिषद नव्हे तर पंचायत समितीच्या निवडणुकीत देखील सर्व्हे करूनच सर्व काही केलं जाईल, असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

आजच्या मुंबईतील मोर्चाबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, या मोर्चात सहभागी झालेले पक्ष मुंबई पालिका निवडणुकीत हळूहळू बाहेर पडतील आणि वेगळे लढतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com