Phaltan Doctor death Case : महिला डॉक्टर,आरोपी पोलीस अन् बीड लिंक; त्यावरून हिणवलं, नेमकं काय घडलं?

Background of the Phaltan Doctor Death Case : साताराचे पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांनीही दोघेही बीडमधील असल्याची माहिती दिली आहे. यातून त्यांची ओळख झाली असण्याची शक्यता आहे.
Tragic death of a female doctor, both the victim and accused linked to Beed district.
Tragic death of a female doctor, both the victim and accused linked to Beed district.Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra crime news : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात सातत्याने नवी माहिती समोर येत आहे. संबंधित डॉक्टर व आरोपी पोलीस निरीक्षक हे दोघेही बीड जिल्ह्यातील होते. या घटनेनंतर वडवणी तालुक्यातील पीडितेच्या गावावर शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे बीडवरून पीडितेला हिणवले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचललेल्या महिला डॉक्टरने तिचे वरिष्ठ अधिकारी तसेच डीवायएसपी दर्जाच्य पोलीस अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केल्याची माहिती उघडकीस आली आहे. पोस्टमार्टेम रिपोर्ट किंवा फिटनेस सर्टिफिकेटसाठी तिच्यावर दबाव टाकला जात होता. त्याच दबावातून आत्महत्या करण्याचा इशारा तिने दिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

साताराचे पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांनीही दोघेही बीडमधील असल्याची माहिती दिली आहे. यातून त्यांची ओळख झाली असण्याची शक्यता आहे. दरम्यान, आरोपींना उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आणल्यानंतर फिटनेस सर्टिफिकेट पोलिसांना हवे तसे देण्याबाबतचा दबाव महिला डॉक्टरांवर होता. त्यावरून डॉक्टर आणि पोलिसांमध्ये वादही झाल्याची माहिती आहे.

Tragic death of a female doctor, both the victim and accused linked to Beed district.
Phaltan Doctor death case : महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; खासदाराचे कनेक्शन आले समोर

या प्रकरणावरून संबंधित पीडितेची चौकशी सुरू होती. या चौकशी समितीला सादर केलेले पत्र समोर आले आहे. या प्रकरणात आपला मानसिक छळ सुरू असल्याचा दावा पीडितेने केला होता. बीडचे *** (पीडितेचे आडनाव) कसे आहेत, कसे गुन्हे करतात, असे म्हणत पीडितेला हिणवले जात होते, असा पत्रात म्हटल्याचे वृत्त ‘न्यूज 18 मराठी’ने दिले आहे.

Tragic death of a female doctor, both the victim and accused linked to Beed district.
PM Modi Speech : बिहारच्या निवडणुकीविषयी पंतप्रधान मोदींचं मोठं भाकित; मतदानाआधी बाहेर काढलं ओबीसी कार्ड...

पीडितेने डीवायएसपी यांना पत्र लिहून तक्रार केली होती. तिने 19 जूनला पत्र लिहिले होते. त्यामध्ये तीन अधिकाऱ्यांची नावे आहेत. त्यामुळे या प्रकरणात पोलीसांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केले का, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. आरोपी पोलिस निरीक्षकाने आपल्यावर चारवेळा बलात्कार केल्याचे पीडितेने तळाहातावर लिहिले होते. पण आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com