Phaltan News : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari यांनी फलटणच्या ऐतिहसिक शहरात येऊन आपल्या सर्वांच्या भविष्याची दारे उघडी करुन दिली आहेत. त्यासाठी खासदार रणजितसिंह निंबाळकरांनी Ranjitsinh Naik Nimbalkar अटोकाट प्रयत्न केले त्याला यश आले आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळे एकत्र आलो आहोत. त्यातून चांगले चित्र निर्माण झाले आहे. भांडायच्यावेळी भांडू, आवश्य भांडू अगदी तुकडे तुटेपर्यंत भांडू पण, फलटण तालुक्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र रहावे, अशी अपेक्षा विधान परिषदेचे माजी सभापती व आमदार रामराजे नाईक निंबाळकर Ramraje Naik Nimbalkar यांनी व्यक्त केली.
केंद्रीय रस्ते व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून फलटण शहर, तालुका व माढा मतदारसंघात विविध विकास कामे व रस्त्यासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मंत्री गडकरी यांचा भव्य नागरी सत्काराचे आयोजन केले होते.या कार्यक्रमात रामराजे बोलत होते. यावेळी त्यांनी नितीन गडकरी यांचे कौतूक केले.
रामराजे म्हणाले, १९९५ मध्ये गडकरी यांच्या बंगल्यात जाऊन मी त्यांना भेटलो होतो. त्यावेळी त्यांनी मल रामराजे पत्र ठेवा व परत फॉलोअपसाठी येऊ नका. तुमचे काम झालं असे समजा, असे त्यांनी सांगितले होते. हा अनुभव ते भारतीय पातळीवर गेले तरी आजही पहायला मिळतो. महाराष्ट्राला नितीन गडकरी यांच्याशिवाय सध्या दिल्लीत कोणीही नेता राहिलेला नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्याकडे असलेली रांग ही पक्ष म्हणून कधीच लागलेली नसते. असा माणूस आपल्याकडे विकासाची वाटचाल घेऊन आला आहे.
फलटण शहरातून दोन राष्ट्रीय महामार्ग पास केले आहेत. त्यांच्यामुळे या शहराचे रुपडे बदलायला फारवेळ लागणार नाही. आमच्या घराण्याने नेहमीच विकास शिकवला. सत्ता सर्वसामान्यांना केंद्रबिंदु माणून वापरली गेली नाही सत्ता राहात नाही, सत्तेचा लोभ होतो. शेतकरी, वारकरी, वंचित असतील त्यांना पुढे न्यायचे असेल तर हे सगळे मागे टाकून गडकरी साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी लागेल, असेही ते म्हणाले.
दिल्लीत शरद पवार यांच्यानंतर गडकरी यांनी महाराष्ट्राची परंपरा जपली आहे. ही परंपरा कायम राहावी. नितीन गडकरी यांनी फलटण सारख्या ऐतिहासिक शहरात येऊन भविष्याची दारे उघडी करुन दिली आहेत. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. खासदारांनीही अटोकाट प्रयत्न केले, त्यालाही यश आले आहे. ऐतिहासिक कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळे एकत्र आलो आहोत. हे चांगले चित्र निर्माण झाले, त्याचे स्वागत करतो. पण, भांडायच्यावेळी भांडू. आवश्य भांडू. अगदी तुकडे तुटेपर्यंत भांडू. पण, फलटण तालुक्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र रहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.