Mumbai News : अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शरद पवार आणखी एक जोराचा धक्का देण्याच्या तयारीत आहे. भाजपमधील हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे फलटणमधील नेते माजी मंत्री रामराजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात जाण्याची शक्यता आहे.
शरद पवार यांच्या पक्षाचा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिवसेंदिवस इनकमिंग वाढलं आहे. याचा सर्वाधिक फटका महायुतीमधील भाजपला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बसू लागला आहे.
रामराजे निंबाळकर गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. याबाबत रामराजे निंबाळकर यांनी देखील सूचक, अशी विधान करत होते. रामराजे निंबाळकर यांचा माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर आणि भाजप नेते जयकुमार गोरे यांच्याशी राजकीय संघर्ष सुरू आहे. या दोघांच्या राजकीय संघर्षावरून त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती. वरिष्ठांकडे तक्रारी देखील केल्या होत्या. 'या तक्रारींची वरिष्ठांनी दखल न घेतल्यास पुढील काळात तुतारी हाती घेऊ', असं सूचक विधान केलं होतं.
रामराजे निंबाळकर यांनी काही दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. निंबाळकर यांनी म्हटले होते की, "त्यात त्यांनी तीन महिन्यांपूर्वी कार्यकर्त्यांनी तुतारीची चर्चा सुरू केली होती. त्यावर मी शांत होतो. मात्र त्यांची दहशत रोखण्यासाठी काहीतरी निर्णय झाला पाहिजे. भाजपशी (BJP) कोणतही वैर, भांडण नाही. आपण हिंदू-मुस्लिम वाद करत नाही, कोण गाय मारली, तर त्याला संरक्षण देत नाही. आपली तक्रार एकच! ती दहशत मोडून काढायची आहे. जे प्रकार चालू आहेत, त्यावर वरिष्ठांनी कारवाई केली पाहिजे".
पुण्यातील इंदापूर मतदारसंघातील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी भाजपला 'राम राम' केला आहे. इंदापूर इथं कार्यकर्त्यांचा मेळावा घेत, त्यांनी शरद पवार यांच्याबरोबर तुतारी हाती घेत असल्याचं जाहीर केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या पक्ष प्रवेशाची सात सप्टेंबर ही तारीख देखील जाहीर केली आहे. शरद पवारांनी महायुतीला लागोपाठ धक्के दिले आहेत. यामुळे भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पुरती घायाळ झाली आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी रामराजे निंबाळकर पक्ष सोडणार असल्याचे वृत्त फेटाळले. ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर हे शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचे वृत्त चुकीचे आहे. हितगुज करण्यासाठी रामराजे निंबाळकर मेळावा घेत आहेत. याचा अर्थ निंबाळकर आणि दीपक चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात जातील असा होत नाही, अशी प्रतिक्रिया मिटकरी यांनी दिली. घाईगडबडीत कुठलाही चुकाची निर्णय निंबाळकर घेणार नाही, याची खात्री असून, ते प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्याशी नक्की चर्चा करतील, असेही अमोल मिटकरी यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.