Anil Sawant : तानाजी सावंतांच्या पुतण्याला आमदार करण्याची मंगळवेढा राष्ट्रवादीला भलतीच घाई!

Pandharpur-Mangalvedha Constituency : अनिल सावंत यांनी अजूनही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेला नाही. नवरात्र महोत्सवानिमित्त प्रमुख चौकांत राष्ट्रवादी काँग्रेसने लावलेल्या डिजिटल फलकावर अनिल सावंत यांचा उल्लेख भावी आमदार असा केला आहे.
Sharad Pawar-Anil Sawant
Sharad Pawar-Anil Sawant Sarkarnama
Published on
Updated on

Mangalvedha, 04 October : शिवसेना नेते तथा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे भैरवनाथ शुगर कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांना आमदार करण्याची मंगळवेढ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना चांगलीच घाई झाल्याचे दिसून येत आहे. कारण, अनिल सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याआधीच मंगळवेढ्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना ‘भावी आमदार’ म्हणत शहरात डिजिटल फलक लावले आहेत, त्यामुळे मंगळवेढ्यात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

पंढरपूर-मंगळवेढ्यातून (Pandharpur-Mangalvedha) शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यासाठी सर्वाधिक इच्छूक आहेत. मात्र, तिकिटासाठी पवारांनी अजून कोणालाही शब्द दिलेला नाही. भैरवनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल सावंत (Anil Sawant), पंढरपूरचे माजी उपनराध्यक्ष नागेश भोसले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वसंतराव देशमुख, रतनचंद शहा बॅंकेचे अध्यक्ष राहुल शहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी, प्रथमेश पाटील हे इच्छुक आहेत.

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके हेही राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळावी, यासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांनी अनेकदा भेटले आहेत. भगीरथ भालके यांनी जन आशीर्वाद यात्रा काढत जनतेचा कौल घेतला, तर भैरवनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी पवारांशी संपर्क ठेवत या मतदारसंघातील अनेक गावांत महिलांसाठी उपक्रम राबविले. तरुणांना हाताला काम देण्यासाठी पंढरपुरात नोकरी मेळाव्याचेही आयोजन केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या नेतेमंडळींनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची एकत्रित भेट घेतली होती. आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी द्यावी, अशी मागणी या इच्छुकांनी केली होती. त्यात अनिल सावंत ही होते. मात्र, अनिल सावंत यांनी अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला नाही.

Sharad Pawar-Anil Sawant
Bharane Vs Patil : दत्तात्रेय भरणेंनी हर्षवर्धन पाटलांना डिवचले; 'मला पूर्वीही अन्‌ आताही चांगली झोप लागते'

गणेशोत्सव काळात अनिल सावंत यांनी मंगळवेढा शहरात गणेशमूर्तींचे मोफत वाटप केले होते. अकलूजच्या कार्यक्रमाला मंगळवेढ्यातून कार्यकर्ते नेण्याची जबाबदारीही त्यांनी उचलली होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांची सगली वाढी आहे. सावंत राबवत असलेल्या प्रत्येक कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे पदाधिकारी हजेरी लावत आहेत.

अनिल सावंत यांनी अजूनही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेला नाही. त्यानंतरही मंगळवेढ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना त्यांना आमदार करण्याची घाई झालेली दिसत आहे. त्यामुळे नवरात्र महोत्सवानिमित्त प्रमुख चौकांत राष्ट्रवादी काँग्रेसने लावलेल्या डिजिटल फलकावर अनिल सावंत यांचा उल्लेख भावी आमदार असा केला आहे, त्यामुळे त्याची चर्चा मंगळवेढा शहरात सुरू आहे.

Sharad Pawar-Anil Sawant
Rajan Patil : माझ्यासह माझ्या परिवाराला लोक गुणदोषांसह स्वीकारतात; राजन पाटलांचे टीकाकरांना उत्तर

शरद पवार ज्यांना संधी देतील त्यांचे काम करणार

यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मंगळवेढा शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळावी; म्हणून अनेक इच्छुक आहेत. मात्र, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार कुणाला संधी देतील, त्याचे काम आम्ही करणार आहोत.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com