Solapur, 29 October : विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा आज (ता. २९ ऑक्टोबर) शेवटचा दिवस होता. सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडी आणि महायुतीसह प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह अनेक अपक्षही विधानसभेच्या आखाड्यात उतरले आहेत, त्यामुळे जिल्ह्यातील अकरांपैकी बहुतांश मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
सोलापूर जिल्ह्यात (Solapur) महायुती आणि महाविकास आघाडीत अनेक मतदारसंघात आघाडी आणि महायुतीमध्ये बिघाडीचे चित्र आहे. सांगोला मतदारसंघ महाविकास आघाडीकडून शेतकरी कामगार पक्षाला सुटेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सांगोल्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून आलेले जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सांगोल्यात शेकापने स्वतंत्रपणे दंड थोपटले आहेत.
सोलापूर शहर मध्य मतदारसंघ न मिळाल्याने महायुतीमधील (Mahayuti) शिवसेनेचे दोन जिल्हाप्रमुख, सोलापूर शहर प्रमुख आणि युवा सेनेचे जिल्हाप्रमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ सोडत संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य पक्षात प्रवेश करत सोलापूर शहर उत्तर, शहर मध्य, सोलापूर दक्षिण मतदारसंघातून भाजपच्या विरोधात दंड थोपटले आहेत.
सोलापूर दक्षिण मतदारसंघातून अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी हे दुपारी अचानकपणे अर्ज भरायला दाखल झाले. याच मतदासंघातून महाविकास आघाडीकडून इच्छूक असलेले दिलीप माने यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली खरी. पण, शेवटपर्यंत त्यांना काँग्रेस पक्षाचा एबी फार्मच मिळू शकलेला नाही.
माढ्यात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांना महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर महायुतीमधील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून माढ्याच्या नगराध्यक्षा मीनल साठे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील विधानसभानिहाय उमेदवार
सोलापूर शहर उत्तर
विजयकुमार देशमुख (महायुती)
अमोल शिंदे (अपक्ष, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख)
महेश कोठे (महाविकास आघाडी)
शोभा बनशेट्टी (अपक्ष, माजी महापौर भाजप)
मोहसीन बागवान (एमआयएम)
सोलापूर दक्षिण
सुभाष देशमुख (महायुती)
अमर पाटील (महाविकास आघाडी)
दिलीप माने (अपक्ष, माजी आमदार काँग्रेस)
धर्मराज काडादी (अपक्ष)
बाबा मिस्त्री (प्रहार)
महादेव कोगनुरे (मनसे)
तौफिक शेख (अपक्ष)
उमेश गायकवाड (शिवसेना बंडखोर)
सोलापूर शहर मध्य
देवेंद्र कोठे (महायुती)
चेतन नरोटे (महाविकास आघाडी)
मनीष काळजे (अपक्ष, माजी शिवसेना जिल्हाप्रमुख)
फारुख शाब्दी (एमआयएम)
तौफीक शेख (अपक्ष)
नरसय्या आडम (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष)
अक्कलकोट
सचिन कल्याणशेट्टी (महायुती)
सिद्धाराम म्हेत्रे (महाविकास आघाडी)
संतोषकुमार इंगळे (वंचित)
मोहोळ
यशवंत माने (महायुती)
राजू खरे (महाविकास आघाडी)
सिद्धी कदम (अपक्ष)
संजय क्षीरसागर (अपक्ष)
माढा
अभिजीत पाटील (महाविकास आघाडी)
मीनल साठे (महायुती)
रणजितसिंह शिंदे (अपक्ष)
बबनराव शिंदे (अपक्ष)
करमाळा
नारायण पाटील (महाविकास आघाडी)
संजय शिंदे (अपक्ष)
दिग्विजय बागल (महायुती)
पंढरपूर-मंगळवेढा
भगीरथ भालके (महाविकास आघाडी काँग्रेस)
अनिल सावंत (महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस)
समाधान आवताडे (महायुती)
बार्शी
राजेंद्र राऊत (महायुती)
दिलीप सोपल (महाविकास आघाडी)
माळशिरस
राम सातपुते (महायुती)
उत्तम जानकर (महाविकास आघाडी)
सांगोला
दीपक साळुंखे (महाविकास आघाडी उबाठा)
शहाजी पाटील (महायुती, शिवसेना)
बाबासाहेब देशमुख (शेकाप)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.