Maratha Reservation : पाच हजार मराठा तरुणांच्या प्रश्नांना पंतप्रधान मोदी उत्तर देणार का ?

Narendra Modi Shirdi Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (ता. २६) शिर्डीच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
Narendra Modi Shirdi Visit :
Narendra Modi Shirdi Visit : Sarkarnama
Published on
Updated on

प्रदीप पेंढारे

Nagar Political News : मराठा समाजाच्या आरक्षणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका काय असणार हे ऐकण्यासाठी आम्ही गुरुवारी (ता. २६) शिर्डी येथील सभेला जाणार आहोत. नगर जिल्ह्यातून या सभेला पाच हजार मराठा तरुण जाणार आहेत. तशी नोंदणी झाली आहे. मराठा आरक्षणावर भूमिका न मांडल्यास समारोपावेळी आम्ही पाच हजार मराठा उभे राहून पंतप्रधानांना जाब विचारणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दिला आहे. यासंदर्भात दोघांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

मराठा आरक्षणावर संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची एकच भूमिका आहे, हे स्पष्ट करत उद्याच्या सभेला पाच हजार मराठा तरुणांची नोंदणी झाली आहे. आम्ही सभेला जाणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी मराठा आरक्षणावर काय भूमिका घेतात हे पाहणार आहोत, असे अण्णासाहेब सावंत यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी मराठा आरक्षणावर भूमिका न मांडल्यास समारोपावेळी आम्ही पाच हजार मराठा सभेत उभे राहून विचारणा करणार आहोत. हा रोष असले, तर रोष समजावा.

Narendra Modi Shirdi Visit :
Raksha Khadse Lok Sabha Election : 'तर तो माझ्यावर अन्याय'; रक्षा खडसेंच्या भूमिकेमुळे भाजपची अडचण !

भाजप खासदार डॉ. सुजय विखे यांची जामखेडमध्ये सभा झाली. तिथेही संभाजी ब्रिगेडने त्यांना मराठा आरक्षणावर जाब विचारला. पंतप्रधानाकडे भूमिका मांडल्याचे खासदार विखे यांनी सांगितले आहे. यावर आता पंतप्रधान मोदी काय भूमिका मांडतात हे पाहण्यासाठी आम्ही पाच हजार मराठा तरुणांना घेऊन चाललो आहोत. आर्थिक निकषावर देऊ केलेले आरक्षण हे अज्ञान आणि चुकीचे आहे, असेही सावंत यांनी सांगितले.

संभाजी ब्रिगेडचे नगर जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे म्हणाले, "मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाची धार वाढल्याने त्यावरून लक्ष हटवण्यासाठी उपमुख्ममंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात वेगवेगळे प्रयोग केले. यात जरांगे पाटलांच्या आंदोलनावर लाठीचार्ज केला. नोकर भरतीचे आणि शाळेचेही कंत्राटीकरण केले. हे कंत्राटीकरण महाविकास आघाडी सरकारच्या काळातील पाप आहे, हे दाखवून राज्यभर भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन करून घेतले. परंतु संभाजी ब्रिगेडची मराठा आरक्षणाची 1990 पासूनची मागणी आहे आणि ती आजही ठाम आहे.

मराठा समाजासोबतच धनगर, मुस्लिम आणि नाभिक समाजाच्या आरक्षणासाठी मराठा समाजाची भूमिका सकारात्मक आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ही भूमिका योग्य वाटल्यानेच त्यांनी पाठिंबा दिला आहे, असेही परकाळेंनी नमूद केले. उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या सभेत मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यांचाच प्रतिनिधी म्हणून मी सभेला जाणार आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Narendra Modi Shirdi Visit :
Vidarbha Farmer's News : रविकांत तुपकर कडाडले; म्हणाले, 'त्यांच्या' हत्या करण्यासही मागेपुढे बघू नका !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com