Rahul Patil: राहुल पाटलांपुढे राजकीय बस्तान बांधण्याचे आव्हान, गोकुळ, 'स्थानिक'ला मैदान मारावेच लागणार

Rahul Patil Challenge Gokul Dairy Local body elections:काँग्रेसमध्ये आपल्याला कदर नाही, असे लक्षात आल्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी महायुतीतील राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
Rahul Patil, Satej Patil
Rahul Patil, Satej PatilSarkarnama
Published on
Updated on

kolhapur News: कृषी राज्यमंत्री कै. श्रीपतरावजी बोंद्रे यांच्या माध्यमातून दिवंगत आमदार पीएन पाटील हे काँग्रेसची जोडले गेले. जवळपास 40 ते 45 वर्ष पाटील गट काँग्रेस आणि खास करून माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या विचारांशी जोडला गेला.

बोंद्रे यांच्यानंतर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या माध्यमातून काँग्रेसमध्ये वर्चस्व निर्माण केले. मात्र त्यांच्या निधनानंतर पुत्र राहुल पाटील यांचा विधानसभेत पराभव झाला आणि त्यांनी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला.

इतके वर्ष काँग्रेसशी निष्ठावंत राहून देखील राज्याच्या मंत्रिमंडळात पी एन पाटील यांना किती स्थान मिळाले नाही यांची खंत कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे सातत्याने डावलल्याची सल मनात असल्याने अखेर पी.एन. पाटील यांचा गट आता राष्ट्रवादीत सामील होत आहे.

आतापर्यंत सांगरूळ आणि आणि नंतरच्या करवीर विधानसभामध्ये झालेल्या ६ निवडणुकीत पी. एन पाटील हे २ वेळा विजयी झाले. मात्र अनेकवेळा पराभव झाल्यानंतर देखील त्यांनी पक्ष सोडला नाही. २०१९ मध्ये विजयी झाल्यानंतर मंत्रीपद मिळेल, अशी आशा कार्यकर्त्यांना होती. मात्र पदरी निराशा आली. मात्र त्यांच्या पश्चात काँग्रेसकडून बेदखल केले जाते. अशी भावना कार्यकर्त्यांच्या मनात आहे. आमदार पाटील यांच्या निधनानंतर प्रकाशने जाणवले.

Rahul Patil, Satej Patil
Raigad Boat Capsize: करंजा गावाजवळ समुद्रात बोट बुडाली; लष्कराचे जवान घटनास्थळी दाखल

काँग्रेसमध्ये आपल्याला कदर नाही, असे लक्षात आल्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी महायुतीतील राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला. भोगावती साखर कारखाना अडचणीतून बाहेर काढण्याच्या अटीवर राहुल पाटील यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश होत आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राहुल पाटील आणि पाटील गटात अस्वस्थ होते. हे काल झालेल्या पत्रकार परिषदेत स्वतः राहुल पाटील यांनी स्पष्ट केले.

गेले अनेक दशके पाटील गट आणि आमदार नरके गट हा एकमेकांच्या विरोधात आहे. गावागावात दोन गटाचे विरोधक असल्याने महायुतीत एकत्र आल्याने या दोन गटांमध्ये समन्वय राखण्याची जबाबदारी या दोन नेत्यांवर असणार आहे. पारंपारिक विरुद्ध नरके गट असल्याचे राहुल पाटील यांनी स्पष्ट केले असले तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये एक संघ ठेवणे आव्हानात्मक असणार आहे.

सध्या गोकुळच्या राजकारणात पीएम पाटील गटाकडे दोन संचालक आहेत त्यामधील चेतन नरके, बाळासाहेब खाडे हे आमदार सतेज पाटील यांच्यासोबत आहेत. राहुल पाटील हे राष्ट्रवादीत गेल्याने बाळासाहेब खाडे हे देखील आता महायुतीचे झाले आहेत. त्यांच्या वाटेला करवीरच्या दोन जागा पुढच्या निवडणुकीत येण्याची शक्यता आहे. पण त्यांनी आता सुरुवातीपासूनच तीन जागांची मागणी केली आहे.

करवीर विधानसभा मतदारसंघातील एस आर चौगुले हे शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके तर, माजी अध्यक्ष विश्वास पाटील आणि बयाजी शेळके हे आमदार सतेज पाटील त्यांच्यासोबत आहेत. या सर्वातून तीन जागा घेणे म्हणजे पाटील गटाचा कस लागणार आहे. शिवाय राधानगरीतील गट देखील शाबूत ठेवण्यासाठी गोकुळ साठी दावा करावा लागणार आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने करवीर विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार चंद्रदीप नरके आणि राहुल पाटील यांचा गट आमने सामने येण्याची शक्यता आहे. त्यातच पारंपारिक विरोधक असल्याची घोषणा राहुल पाटील यांनी केली असली तरी या दोघांमधील अंतर्गत वाद हा धुमसतच राहणार आहे. शिवाय कार्यकर्त्यांची मने जुळवणे हे कठीण आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राहुल पाटील यांना स्वतःचे अस्तित्व दाखवावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com