रशिया-युक्रेन युद्धावर आठवलेंनी केली कविता

रिपब्लिकन पक्षाचे नेते तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले ( Ramdas Athawale ) हे त्यांच्या कविता व भाषणाच्या विशिष्ट शैलीसाठी प्रसिद्ध आहेत.
Ramdas Athawale
Ramdas AthawaleSarkarnama
Published on
Updated on

शिर्डी ( जि. अहमदनगर ) - रिपब्लिकन पक्षाचे नेते तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले ( Ramdas Athawale ) हे त्यांच्या कविता व भाषणाच्या विशिष्ट शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील व पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाची शिर्डीत रामदास आठवले यांच्या उपस्थितीत काल ( रविवारी ) बैठक झाली. या प्रसंगी त्यांनी रशिया-युक्रेन युद्धावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिघ्र कविता केली. ( Poems on the Russia-Ukraine War )

या बैठकीला रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी श्रीकांत भालेराव, बाळासाहेब गायकवाड, दीपक गायकवाड, कैलास शेजवळ, रावसाहेब बनसोडे, प्रदीप बनसोडे, सुरेंद्र थोरात, भीमराज बागूल आदी उपस्थित होते.

Ramdas Athawale
Video : तिसरी आघाडी जरी झाली तर आम्हाला धोका नाही - आठवले

रामदास आठवले म्हणाले, पुतिन यांचा बिघडला आहे ब्रेन त्यामुळे परेशान आहे युक्रेन, अशा शब्दांत रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याबाबत यांनी चक्क कवितेतूनच प्रतिक्रिया व्यक्त केली. त्याच बरोबर नगर-कोपरगाव रस्त्यांवरील खड्ड्यांपासून ते युक्रेनवरील हल्ल्यापर्यंत लोकल ते ग्लोबल मुद्द्यांवर त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत भाष्य केले.

ते पुढे म्हणाले, नगर-कोपरगाव रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी साईसंस्थान व राज्य सरकारने पुढाकार घ्यावा. शिर्डीच्या विकासासाठी निधी द्यावा. मंत्री म्हणून नबाब मलिक चांगले मात्र त्यांचे जमिनीचे व्यवहार चांगले नाहीत. कुणी कुणाची जमीन बळकावणे चांगले नाही. एखाद्या मंत्र्याला ताब्यात घेऊन राज्यातील सरकार पाडण्यात आम्हाला स्वारस्य नाही.

Ramdas Athawale
रामदास आठवले म्हणतात; शिवसेनेला मुंबईत हरवणे अवघड नाही...

शिवससैनिकांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जावेसे वाटत नाही. मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांचे प्रत्यंतर येईल, भाजप रिपब्लिकन पक्ष युती तेथे सत्तेवर येईल. अडीच अडीच वर्षांचा मुख्यमंत्री या फार्म्युल्यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अद्यापही विचार करावा. अन्यथा आणखी अडीच वर्षांनी त्यांना सत्ता गमावण्याची वेळ येईल. मोदी जगातले प्रथम क्रमांकाचे प्रभावशाली नेते आहेत. एकेकाळी अवघे दोन खासदार असणाऱ्या भाजपने केंद्रात सलग दोन वेळा सत्ता काबिज केली. येत्या लोकसभा निवडणुकीत देखील त्याची पुनरावृत्ती होईल. भाजप हा सर्व समाज घटकांना समान न्याय देणारा पक्ष आहे. उत्तर प्रदेशासह पाचही राज्यांत भाजप विजयी होईल. मायावतीचा प्रभाव कमी होतो आहे, असे त्यांनी सांगितले.

Ramdas Athawale
रामदास आठवले यांनी दाखवल्या शशी थरूर यांच्या स्पेलिंग मिस्टेक

मराठी, ओबीसी आरक्षण

मराठा आणि ओबीसी आरक्षण जाण्यास राज्यातील उद्धव ठाकरे यांचे सरकार जबाबदार आहे. या सरकारला सर्वोच्च न्यायालयात सक्षमपणे बाजू मांडता आली नाही. याउलट तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या काळात मराठा आरक्षण टिकले होते. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सुरू केलेल्या उपोषणाला आपला पाठिंबा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com