Kolhapur Police : तोतया भरारी पथकाने 25 लाख लुटले; कोल्हापूर पोलिसांची कामगिरी जगात भारी

Five criminals arrested Kolhapur businessmen 25 lakhs Election Commission : निवडणूक आयोगाच्या भरारी पथकातील अधिकारी बननून व्यावसायिकाचे 25 लाख लुटणाऱ्या पाच सराईत गुन्हेगारांना कोल्हापुरच्या पोलिसांचा इंगा.
Kolhapur Police
Kolhapur PoliceSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : तोतया भरारी पथकाने कोल्हापुरात 25 लाख 50 हजार रुपयांचे रक्कम लाटली होती. हा प्रकार तीन ते चार दिवसांपूर्वी घडला होता. जत्रेत पाळणा लावणारे व्यावसायिक सुभाष हारणे लाखाच्या घरात रक्कम घेऊन येत असल्याची माहिती काही सराईत गुन्हेगारांना मिळाल्यानंतर त्यांनी भरारी पथक स्थापन करून ही कार लुटली होती.

निवडणुकीत इतकी रक्कम घेऊन जात असल्याने ही कारवाई करून लुटण्याचा प्लॅन त्यांनी आखला होता. तो यशस्वी झाला. मात्र पोलिसांनी तपासाची चक्री गतिमान फिरवल्यानंतर भरारी पथकाला आरोपी शोधण्यात यश आले.

जत्रेतील पाळणा लावणारे व्यावसायिक सुभाष हरणे 25 लाख रुपयांची रक्कम घेऊन कोल्हापुरात येणार असल्याची माहिती काही गुन्हेगारांना मिळाली होती. रेकॉर्डवरील गुन्हेगार (Crime) असलेला हर्षद खरात आणि लाल्या जाधवला याने साधून सुभाष हरणे यांना लुटले. तपासणी पथकाचे सोंग घेऊन पाच जणांनी व्यावसायिकाला लुटण्याचे परफेक्ट नियोजन झाले.

Kolhapur Police
Kolhapur Vidhansabha Election: कोल्हापुरात मुश्रीफ, माने, महाडिकांनी आघाडीला टाकले मागे! निकाल नव्हे तर...

व्यावसायिक हारणे पाळण्याचे भाडे महिन्यात किंवा दोन महिन्यांनी गोळा करून बागल चौकात येत असतात, याची माहिती खरात व जाधव या दोघांना होती. त्यांनी विक्रमनगरातील अट्टल गुन्हेगार संजय ऊर्फ माया किरणगेला याची टीप देऊन व्यावसायिकाच्या लुटीचे नियोजन केले. आरामबसमधून सुभाष हरणे कोल्हापुरात मोठी रक्कम घेऊन येत असल्याची माहिती मिळाली. हरणे बसमधून पावडे हॉटेल नजीक येतात अधिकाऱ्यांच्या वेशभूषा करून असलेले संशयताने हारणे यांना लुटले.

Kolhapur Police
Nitin Gadkari : नितीन गडकरींच्या आईंची काय होती इच्छा; मृत्यूच्या सहा महिने आधी काय सांगितले होते?

12 नोव्हेंबरला ही घटना घडली. हारणे यांना लुटल्यानंतर त्यांनी पाचगाव गाठले. तासगावमधून गुन्ह्यात वापरलेली कार ही सोडून त्याने दुसरी कार घेऊन गोव्याला पलायन केले. कोगनोळी टोलनाका चुकविण्यासाठी अलीकडील गावातील चोरट्या मार्गाने ते गोव्याकडे रवाना झाल्याने सीसीटीव्हीमध्ये आले नव्हते. हरणे यांच्या हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसात (Police) त्यांनी तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत परिसरातील सीसीटीव्ही चेक केले. सीसीटीव्हीमध्ये संबंधित संशयित जे कार घेऊन आले होते त्याचा छडा लागला. त्यांनी थेट कंपनीशी संपर्क करून कोल्हापुरात सिल्वर कलरच्या कोणकोणत्या भागात किती कार विकले आहेत, त्याची माहिती मागवली.

त्या आधारे पोलिस कोल्हापूर शहरात 16 आणि पन्हाळा शाहूवाडी भागात एक कार दिल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तपास करत पाचगावमधील कार मालकाजवळ पोचले त्यानंतर त्यांची नावे निष्पन्न झाली. या मोटारीच्या मालकाने ती एका शोरूमला दिल्याचे सांगितले, तर शोरूमधून ती संशयित आरोपीने घेतल्याची माहिती मिळताच पोलिसांसमोर पहिला संशयित स्पष्ट झाला. तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी अन्य साथीदारांचा छडा लावला होता. गोव्यातून तिघे परतत असतानाच एलसीबीच्‍या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com