श्रीरामपूरमध्ये राजकीय फराळ : ससाणेकडे मुरकुटे, आदिकांकडे कानडे यांची हजेरी

दिवाळी सणानंतर आता राजकीय फराळांची मेजवानी सुरू झाली आहे.
Karan Sasane, Bhanudas Murkute, Lahu Kanade & Anuradha Adik
Karan Sasane, Bhanudas Murkute, Lahu Kanade & Anuradha AdikSarkarnama

महेश माळवे

Shrirampur : दिवाळी सण आटोपटत आल्यानंतर आता राजकीय फराळांची मेजवानी सुरू झाली आहे. पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या फराळ कार्यक्रमात शहर, तर माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्याकडे ग्रामीण भागाची उपस्थिती लक्षणीय होती. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणातील बदलत्या समीकरणाची ही नांदी तर नाही ना अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे.

येथील मातोश्री मंगल कार्यालयात रविवारी (ता. 30) ससाणे गटाच्या वतीने दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शहरातील कार्यकर्ते व्यापारी व (स्व.) जयंत ससाणे यांना मानणारा वर्गाने मोठ्या संख्येने हजर लावली. तसेच गेल्या दोन वर्षांपासून ससाणे-मुरकुटेंमध्ये सुरू असलेली सहमती एक्स्प्रेस यावेळीही दिसून आली. माजी आमदार भानदास मुरकुटे यांना लाडू भरवीत ससाणे यांनी हा राजकीय संबंधाचा गोडवा पुढील काळातही असाच सुरू राहील हे स्पष्ट केले.

Karan Sasane, Bhanudas Murkute, Lahu Kanade & Anuradha Adik
लहू कानडेंची ससाणे गटावर अप्रत्यक्ष टीका : गद्दार म्हणणारे ढोंगी

यावेळी माजी नगराध्यक्षा राजश्री ससाणे, साई संस्थानचे माजी विश्वस्त सचिन गुजर, अण्णासाहेब डावखर, खंडकरी नेते अण्णासाहेब थोरात, माजी नगराध्यक्ष संजय फंड, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण नाईक, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब दिघे, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय छल्लारे, अमृतराव धुमाळ, शेतकरी संघटनेचे बाळासाहेब पटारे, राजेंद्र पाऊलबुद्धे, मुज्जफर शेख, श्रीनिवास बिहाणी, शशांक रासकर, दिलीप नागरे, रितेश रोटे, आशिष धनवटे, भरत कुंकलोळ, राजेंद्र आदिक, शेखर दुबैया, आबासाहेब थोरात, सुधीर नवले आदी उपस्थित होते.

Karan Sasane, Bhanudas Murkute, Lahu Kanade & Anuradha Adik
राधाकृष्ण विखेंचा थोरात- ससाणे गटाला धक्का

काँग्रेस भवन येथे माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या वतीने मंगळवारी (ता. 1) दिवाळी फराळाचा कार्यक्रम झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार लहू कानडे यांच्या हस्ते गरजू विद्यार्थिनीला सायकल भेट देण्यात आली. आदिकांच्या फराळाला ग्रामीण भागातील उपस्थिती जशी लक्षणे होती. तशीच ससाणे गटापासून दुरावलेला अंजुम शेख गटानेही या ठिकाणी तळ ठोकत फराळाचा आस्वाद घेत लक्ष वेधले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, अजय डाकले, माजी उपनगराध्यक्ष अंजुम शेख, रवींद्र गुलाटी, राजेश अलघ, मुक्तार शहा, राजेंद्र पवार, सुनील थोरात, प्रशांत खंडागळे, नितीन गवारे, हंसराज आदिक, राम टेकावडे, शिवसेनेचे दाेन्ही गटाचे पदाधिकारी, अर्चना पानसरे, जया जगताप, प्रियंका जानवेजा आदी उपस्थित होते.

Karan Sasane, Bhanudas Murkute, Lahu Kanade & Anuradha Adik
लहू कानडेंचा करण ससाणेंना धक्का : अंजुम शेख गटाशी साधली जवळीक

फराळ गोडवा अन् तिखट ठरणार

आगामी काळात बाजार समितीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीत मुरकुटे-ससाणे यांची युती जवळपास निश्चित आहे. त्याचवेळी आदिक-विखे अशी युती होणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. आज आमदार कानडे यांनी लावलेल्या उपस्थितीने राजकारणात काहीही अशक्य नाही याची झलक या निमित्ताने पहावयास मिळाली. एकंदरीतच हा दिवाळी फराळ कोणासाठी लाडूचा गोडवा, तर कोणासाठी चकली, चिवड्यासारखा तिखट ठरणार हे मात्र नक्की.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com