BJP Vs NCP: अकोल्यात धोतरावरून पेटलं राजकारण

भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड ( Madhukarrao Pichad ) यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपने अकोल्यात सत्ता राखली.
Akole BJP
Akole BJPSarkarnama

अकोले ( अहमदनगर ) : अकोले नगर पंचायतची नुकतीच निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड ( Madhukarrao Pichad ) यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपने सत्ता राखली. मतमोजणीनंतर भाजप ( BJP ) कार्यकर्त्यांनी जल्लोष करत धोतरे उडविली. हे धोतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( NCP ) ज्येष्ठ नेत्याचे प्रतीक असल्याची चर्चा दबक्या आवाजात अकोल्यात सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमध्ये सोशल मीडियावर राजकीय वाद पेटला आहे. Politics ignited from dhotar in Akola

अकोले तालुक्यात धोतरा वरून जोरदार राजकारण पेटले असून राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर बहुजनांच्या नेत्याचा अवमान करणाऱ्यांना धडा शिकवू असे सांगत आपल्या जेष्ठ नेत्याची बाजू घेत उत्तर दिले आहे. तर भाजपने धोतर उडविण्यामागे आमचा संबंधच काय ? असा प्रतिप्रश्न केला आहे.

Akole BJP
वैभव पिचड म्हणाले, अकोले नगरपंचायत निवडणुकीत भाजपचीच सत्ता येणार...

2019च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर हे मधुकरराव पिचड यांच्या बरोबर होते. विधानसभेच्या प्रचाराच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार अकोले येथे आले असता त्यांना स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गायकर यांच्याबद्दल बोला अशी चिठ्ठी पाठवली होती. त्यावेळी अजित पवारांनी गायकरांचे धोतर फेडण्याची भाषा केली होती. मग आज भाजपच्या कार्यकर्त्यांवर आरोप कशासाठी करतात. धोतर उडविण्याची आमची संस्कृती नाही, असे सांगत भाजपने या प्रकरणात हात वर केले आहेत.

Akole BJP
सीताराम गायकर यांनी विधानसभेत पिचड यांचे काम केलेच नाही

चिठ्ठी देणाऱ्यांबरोबरच गायकर

विधानसभा निवडणुकीत सीताराम गायकर भाजपमध्ये होते. अजित पवारांना गायकरांच्या गावाची चिठ्ठी देणाऱ्या त्यावेळच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर गायकर सध्या आहे. अजित पवारांच्या वक्तव्यावर टाळ्या वाजविणाऱ्यांच्या जवळ बरोबर सध्या गायकर आहेत, असा आरोपही भाजपकडून होत आहे.

Akole BJP
पिचडांना धक्का ! सीताराम गायकर उद्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार

तो मी नव्हेच

भाजपच्या मिरवणुकीत भाजपचे कार्यकर्ते धोतर उडवत असल्याचा फोटो सोशल मीडिया व प्रसार माध्यमांत प्रसिद्ध झाले आहेत. यावर भाजप कार्यकर्ते स्पष्टीकरण देताना सांगत आहेत की, आम्ही मिरवणुकीत जल्लोष करत असताना कोणी तरी आमच्या अंगावर धोतर फेकले म्हणून आम्ही ते उडवून लावले, असे सांगत भाजप कार्यकर्ते या प्रकरणाशी संबंध नसल्याचे सांगत आहेत.

काँग्रेसची भूमिका

या प्रकरणावरून काँग्रेसचे नेते मधुकर नवले यांनीही आमदार किरण लहामटे व सीताराम गायकर यांना पत्रकार परिषदेत शाल जोडे मारले आहेत. त्यामुळे नगरपंचायत निवडणूक संपली असली तरी राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजपमध्ये सोशल वॉर सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com