अकोले ( अहमदनगर ) : अहमदनगर जिल्ह्यातील चार नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात अकोले नगरपंचायतीचा समावेश आहे. भाजपचे ( BJP ) अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री वैभव पिचड ( Vaibhav Pichad ) यांच्या नेतृत्वाखाली भाजपने काल ( सोमवारी ) अकोले येथे मोठे शक्तिप्रदर्शन केले. अकोले नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. दुसरीकडे महाविकास आघाडी होणार की नाही या बाबत अद्याप संभ्रमाचे वातावरण आहे. आज ( मंगळवार ) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. Vaibhav Pichad said, BJP will come to power in Akole Nagar Panchayat elections ...
अकोले नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. भाजपने काल बहुतांश प्रभागातील उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीत आघाडी घेतली. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे अद्याप जागा वाटपा बाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत.
काल ( सोमवारी ) सकाळी अकोलेतील भाजप पक्ष कार्यालय पासून मोठ्या संख्येने कार्यकर्ते घोषणा देत तहसील कार्यालयात आले. यावेळी माजी आमदार पिचड यांच्या उपस्थितीत उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी कैलास वाकचौरे, भाजपा जेष्ठ नेते शिवाजी धुमाळ, ॲड. वसंतराव मनकर, तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, माजी नगराध्यक्ष ॲड के.डी.धुमाळ, पंचायत समितीच्या सभापती उर्मिला राऊत, उपसभापती दत्ता देशमुख, माजी सभापती भानुदास गायकर, विजय भांगरे, रमेश धुमाळ, सुधाकरराव देशमुख, भाजपचे नितीन जोशी, धनंजय संत, रोहिदास धुमाळ, रमेश नाईकवाडी, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, सचिन शेटे, परशराम शेळके, सोनाली नाईकवाडी आदी उपस्थित होते.
वैभव पिचड म्हणाले, विधानसभा निवडणुकीनंतर तालुक्यासह शहरातील जनतेला खुप अपेक्षा होत्या मात्र दोन वर्षांत जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. दोन वर्षात त्रस्त झालेली जनता पुन्हा आपल्या पाठीशी उभी राहिली आहे. त्यामुळे येत्या नगरपंचायत निवडणुकीत भाजपचीच सत्ता येणार असल्याचा दावा पिचड यांनी करत अकोले तालुक्यातील महाविकास आघाडी ही तीन तिघाडा काम बिघाडा आहे. तालुक्यातील गोरगरिबांचे धान्य चोर कोण आहे. हे जनतेने पाहिले असल्याचा टोमणा ही त्यांनी मारला.
ते पुढे म्हणाले, अकोले तालुक्यातील जनतेच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा त्यांना विसर पडला आहे. त्यांना अतिवृष्टीने होळपळणारा शेतकरी आज दिसत नाही. तालुक्यातील गोरगरिबांचे धान्य चोऱ्यांना त्यांची जागा येत्या नगरपंचायत निवडणुकीत जनता दाखवून देईल असा विश्वास पिचड यांनी व्यक्त केला.
आरपीआय भाजप बरोबर
अकोले नगरपंचायत निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ( आठवले गट) ही भाजप सोबत आहे. नगरपंचायतच्या सर्वच्या सर्व 17 प्रभागात भाजपच्या चिन्हावर सर्व उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहे. एक जागा आम्हाला मिळेल असा विश्वास आर.पी.आय चे नेते विजय वाकचौरे यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.