सरकारनामा ब्यूरो
पुणे : निवडणुका आल्या की सभा मेळावे घेऊन आणि लक्ष घालून काही होत नसतं. सत्ता मिळण्यासाठी पाच वर्षे सलगपणे काम करावं लागतं अशा शब्दात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली.
गेल्या आठवड्यात पुणे व पिंपरीत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली मेळावे झाले. यावेळी बोलताना दोन्ही महानगरपालिकांत शिवसेनेची पूर्ण सत्ता यायला हवी. त्यासाठी कामाला लागण्याची भूमिका खासदार राऊत यांनी मांडली होती. या संदर्भात विचारले असता दरेकर म्हणाले, ‘‘ सत्ता येण्यासाठी पाच वर्षे सलगपणे काम करण्याची सवय असायला हवी. पुणे-पिंपरीसह राज्यात सत्ता असलेल्या सर्वच महापालिकांमध्ये भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक सलगपणे काम करीत आहेत. पुण्यातील काम उत्तम असून पुण्याचा विकास भारतीय जनता पार्टी उत्तमपणे करू शकते.’’
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी युतीच्या चर्चेवर बोलताना दरेकर यांनी राजकारणात काहीही होऊ शकतं, असं विधान केलं . ते म्हणाले, ‘‘कट्टर हिंदुत्ववादी असलेली शिवसेना कॉंग्रेस-राष्ट्रवादीबरोबर सत्तेत जाऊ शकते त्यामुळे राजकारणात कोणतीही गोष्ट अशक्य नाही.याचा अर्थ मनसेबरोबर युती होईल की नाही हे सांगू शकत नाही. याबद्दलचा संपूर्ण निर्णय पक्षातील वरिष्ठ घेतील.’’
या सरकारच्या काळात केवळ घोषणा होत आहेत.प्रत्यक्ष कृती शून्य आहे. विदर्भ-मराठवाड्यातील शेतकरी अतिवृष्टीने पुरता बुडाला आहे. उभी पिके पाण्यात नासून गेली आहे. मात्र, सरकार तत्काळ कोणताही निर्णय घ्यायला तयार नाही.लोक ओल्या दुष्काळात बुडत असताना परळीत मंत्र्यांच्या सत्काराला फटाक्याची आतषबाजी होत आहे. त्यामुळे हे सरकार निव्वळ ढोंगी सरकार असून सामान्यांची कसलीही काळजी या सरकारला नाही, असा आरोप दरेकर यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.