अहमदनगर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणात शिवसैनिकांवर तडीपारी केली जात होती आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसैनिकांचे खच्चीकरण केले जात होते, असा आरोप केला होता. या आरोपाला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून प्रतिउत्तर दिले आहे. ( Prajakt Tanpure recites Eknath Shinde: Bhagyashree Mokate is reminded )
प्राजक्त तनपुरे यांनी म्हंटले आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांबद्दल मला आदर आहे. साहेबांनी त्यांच्या भाषणात आज सांगितलं की शिवसैनिकांवर तडीपारी केली जात होती आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसैनिकांचं खच्चीकरण केलं जात होतं. मला मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणावेसे वाटते की युती सरकारच्या काळात 5 वर्षांपूर्वी आपल्याच पक्षाची नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्या भाग्यश्री मोकाटे हिच्यावर मोक्का लावण्यात आलेला आहे, असा टोलाही त्यांनी लावला. (Eknath Shinde News in Marathi)
त्यांनी पुढे म्हंटले आहे की, माझ्या माहितीप्रमाणे पदवीचा अभ्यास करत असताना एका गंभीर गुन्ह्यात बिचाऱ्या भाग्यश्रीचा काही संबंध नसताना गोवण्यात आले व तिचं व कुटुंबाचं आयुष्य उध्वस्त करण्यात आलं. आता हे खच्चीकरण तत्कालीन सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद व गृहमंत्रीपद सांभाळणाऱ्या भाजपने केलं का याचा आपण कृपया विचार करावा. आणि कृपया भाग्यश्रीला न्याय देण्याचा प्रयत्न करावा, असे त्यांनी सुचविले.(Political News Updates)
मी आपला स्वभाव जवळून बघितला आहे. आपण नक्कीच कृपादृष्टीने विचार करून शिवसेनेची जिल्हा परिषद सदस्या भाग्यश्री मोकाटे हिला न्याय मिळवून द्याल अशी अपेक्षा करतो. तसेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं अशा पद्धतीने खच्चीकरण करणाऱ्या भाजपची साथ सोडून पुन्हा महाविकास आघाडीसोबत याल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
भाग्यश्री मोकाटेंबाबत काय घडले होते
6 वर्षांपूर्वी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागली होती. या निवडणुकीत पांगरमल (ता. नगर) येथे विषारी मद्यप्राशन केल्याने काही नागरिकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी डॉ. भाग्यश्री मोकाटे या शिवसेना उमेदवारावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा भाजपच्या एका बड्या नेत्याच्या सांगण्यावरून दाखल करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेकडून होतो. हाच धागा पकडत प्राजक्त तनपुरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शेलक्या भाषेत प्रतिउत्तर दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.