राहुरी ( अहमदनगर ) : महाराष्ट्राचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) यांच्यावर भाजपचे ( BJP ) नेते किरीट सोमय्या ( Kirit Somaiya ) यांनी आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले होते. यावर प्राजक्त तनपुरे यांनी सोमय्या यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. Prajakta Tanpure said, how could my name be pronounced by the one who criticized me regarding ED ...
काल (शुक्रवारी) राहुरी येथे राष्ट्रवादी परिसंवाद कार्यकर्ता शिबिरात मंत्री तनपुरे बोलत होते. अध्यक्षस्थानी गंगाधर जाधव होते. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माहिती, तंत्रज्ञान विभागाचे प्रदेशाध्यक्ष जितेश सरडे, तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, शहराध्यक्ष संतोष आघाव, धीरज पानसंबळ, धनराज गाडे, सभापती बेबी सोडनर, विठ्ठल मोकाटे, सुरेश निमसे, रवींद्र आढाव, बाळासाहेब लटके, विजय कातोरे उपस्थित होते.
प्राजक्त तनपुरे म्हणाले, त्यांनी माझं नाव घेऊन टीका केली. टिव्हीवरही प्रतिक्रिया दिली. मंत्री प्राजक्त तनपुरे प्रसाद शुगरच्या संचालक मंडळात आहेत, असे सांगितले. पण मला एक आश्चर्य वाटलं. त्यांना माझं नाव कसं घेता आलं. माझं नाव उच्चारायला अवघड आहे. त्यांनी प्राजक्त हे पूर्ण नाव उच्चारलं कसं. मला त्यांच्या व्यंगावर टीका करायची नाही पण वास्तविक पाहता 13 कोटी कुठे आणि 100 कोटी कुठे. 13 कोटीचा संदर्भ त्यांनी 100 कोटीशी लावला. मलाही आठवत नाही त्यावेळ कारखाना खरेदी केला आहे. त्यावेळी एवढे बाजारभाव नव्हते. हे कोट्यावधीचे आरोप मी मंत्री झाल्यापासून सुरू झाले आहेत. मला ईडी कार्यालयाने बोलावल्यावर मी एकटाच साध्या कपड्यांत गाडीत बसून गेलो होतो. चौकशी नंतर थोड्यावेळाने परत आलो, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.
ते पुढे म्हणाले, "ईडीच्या चौकशीतून काही निष्पन्न होणार नाही. टेन्शन घेण्याचे कारण नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय. याचा अभिमान आहे. राहुरी तालुक्यात आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, राहुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीत सर्व जागांवर दैदिप्यमान विजय मिळविण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे." असे आवाहनही प्राजक्त तनपुरे यांनी केले.
मंत्री तनपुरे यांनी सांगितले की, "तालुक्यात जिल्हा परिषदेचा एक गट, राहुरी पालिकेत तीन प्रभाग वाढणार आहेत. त्यांची रचना कुणालाही माहिती नाही. त्यामुळे, इच्छुकांनी दमाने घ्यावे. उमेदवारी मागण्याचा सर्वांना अधिकार आहे. उमेदवार ठरल्यावर एकदिलाने काम करावे. राहुरीतील जॉगिंग ट्रॅकसाठी आणखी दोन कोटी रुपये व शहरातील चौक, बगीचे सुशोभीकरणासाठी 50 लाख असा अडीच कोटींचा निधी मंजूर केला आहे."
"राहुरीच्या बसस्थानकासाठी अर्थसंकल्पात 17 कोटींची तरतूद केली होती. परंतु, एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी निधी वळविल्याने काम प्रलंबित आहे. त्यावर लवकरच तोडगा काढू. राहुरी ग्रामीण रुग्णालयाच्या जमिनीचा वाद लवकरच मिटणार आहे. येत्या काळात रुग्णालय इमारतीचा प्रश्न मार्गी लागेल. राहुरी शहरातील भुयारी गटार योजनेचे काम येत्या सहा महिन्यात मार्गी लागेल." असे मंत्री तनपुरे यांनी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.