'जवळच्यांनीच माझा ठरवून कार्यक्रम केला'

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (KDCC bank Election) अपक्ष आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade) यांना पराभवाचा धक्का बसला
Prakash Awade
Prakash Awade
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत (KDCC Bank Election) सत्ताधारी आघाडीने बहुमताने विजय मिळवला. तर आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade) यांना पराभवाचा सामना करावा लागला. आपल्या जवळच्याच लोकांमुळे आपला पराभव झाल्याची खंत विनय कोरे (Vinay kore) यांनी व्यक्त केली आहे. ''सत्ताधारी गटातील काहींनी दगाबाजी केल्याने आपला पराभव झाल्याचा आरोप आमदार विनय कोरे यांनी केला.

इचलकरंजीमध्ये (Ichalkaranji) बोलताना प्रकाश आवाडे यांनी आपली नाराजी व्यक्त केली. 'मला कधी ना कधी यांचा झटका बसणार हे मला माहित होत. त्यामुळे मला हे नवीन नाही. पण आमच्या सर्वात जवळच्या लोकांनी मला झटका दिला. हा अनुभव काल-परवाच आहे. जिल्हा बँकेत मला त्यांनी जवळ करुन पराभवाचा झटका दिला.' अशी खंत प्रकाश आवाडे व्यक्त केली.

Prakash Awade
सासूसाठी भांडण केलं... पण सासूच आली वाटणीला : विनय कोरेंची अवस्था

'आता मला झटक्यांचे महत्त्व राहिले नाही. पण त्या झटक्याचं कसं पांग फेडायचं, हे आवडेंना चांगलंच माहित आहे. इचलकरंजीकरांनी हे अनुभवलं आहे. आता याचा जिल्ह्यालाही याचा अनुभव येईल. लोकांच्या हातून जे पाप झालं आहे, त्याची किंमतही त्यांना मोजावी लागणार. असा इशाराही त्यांनी दिला. तसेच, कोल्हापूर जिल्हा सुद्धा कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक लक्षात ठेवेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

तर विनय कोरे म्हणाले, सत्ताधारी पूर्ण पाठीशी राहिले असते तर शिवसेनेला एकही जागा जिंकता आली नसती. पण सत्ताधारी गटातीलच काही नेत्यांनी धोका दिल्याने प्रकाश आवाडे यांना पराभव स्वीकारावा लागला, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.

Prakash Awade
आमदार प्रकाश आवाडेंना पराभवाचा धक्का; आबिटकर ठरले जायंट किलर

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (KDCC Bank Election) शाहुवाडी तालुका विकास संस्था गटातील रणवीर गायकवाड व प्रक्रिया संस्था गटातील संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर (Babasaheb Patil- Aarsulekar) यांचा विजय हा आमदार डॉ. विनय कोरे (Dr. Vinay Kore) यांना धक्का समजला जातो.

विनय कोरे यांनी सत्तारूढ पॅनेलमध्ये प्रक्रिया गटातून आसुर्लेकर यांना तीव्र विरोध केला होता. त्यांना घेणार असाल तर मी तुमच्यासोबत नाही असा इशाराही त्यांनी दिला होता. कोरे यांच्या आक्रमक भुमिकेमुळे सत्तारूढ गटाचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे हतबल झाले होते, त्यातून त्यांनी आसुर्लेकर यांच्याऐवजी प्रदीप पाटील-भुयेकर यांना उमेदवारी दिली. पण या गटातून आसुर्लेकर यांनी सर्वाधिक मते घेऊन एकप्रकारे कोरे यांनाच शह दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com