Praniti Shinde : "सत्तेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठलंही कांड करतील..."

Terrorist attack : शहीद जवानांना श्रद्धांजली वाहत नसल्याचा गंभीर आरोप
Praniti Shinde News
Praniti Shinde NewsSarkarnama
Published on
Updated on

Solapur : पूँछ जिल्ह्यात भारतीय लष्करावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर विरोधी पक्षांकडून नरेंद्र मोदींवर कठोर शब्दांत टिका केली जात आहे. मोदी या हल्ल्यातून येणाऱ्या निवडणूकीत फायदा घेणार का? असा थेट सवालच संजय राऊत यांनी विचारला होता. आता, आमदार प्रणिती शिंदे यांनी देखील दहशतवादी हल्ल्यावरून नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे. तसेच सत्तेसाठी मोदी काहीही कांड करतील, अशी भीती देखील शिंदे यांनी व्यक्त केली.

Praniti Shinde News
Basavraj Patil : बसवराज पाटीलसाहेब,आपण भाजपमध्ये जाणार का? एकदा खरं सांगून टाकाच...

देशात जात धर्म पाहून कधीच मतदान झाले नाही. मात्र,सत्तेसाठी आता नरेंद्र मोदी काहीही करतील. कोणतही कांड करतील. आपला देश ज्या दिशेने चालला आहे ते पाहून भीती वाटते. देशात अराजकता माजली आहे. सत्तेसाठी षडयंत्र रचणाऱ्यांविरोधात सर्वांनी एकत्र यायला हवे, असे आवाहन देखील प्रणिती शिंदे यांनी केले.

नरेंद्र मोदी यांनी कधी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहली आहे का? जवान आपल्यासाठी प्राण अर्पण करतात. आपल्यासाठी लढतात. मात्र, शहीद जवानांना पंतप्रधान मोदी यांनी कधी ही संसेदत श्रद्धांजली वाहताना पाहिलं आहे का? पंतप्रधान मोदी हे केवळ प्रसिद्धीसाठी काम करतात, असा टोला देखील शिंदे यांनी लगावला.

जवानांना दहशतवादी हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे आम्हाला खुलासा हवा आहे. मोदींच्या हात हलवण्याची देखील खिल्ली उडवत मोदी नेहमी विमानातून टाटा बायबाय करता. ते कोणाला टाटा करतात हे आम्हाला समजल नाही. प्रसिद्धीसाठी केवळ ते करतात. दरम्यान, काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यातील हल्यानंतर सशस्त्र दलांकडून सर्च ऑपरेशन हाती घेण्यात आले आहे. दहशतवाद्यांचे तळ शोधण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com