Praniti Shinde News : प्रणिती शिंदेंनी मुस्लिम बांधवांना घातली भावनिक साद; म्हणाल्या, 'अजमेर जाकर मेरे लिए…'

Congress and BJP : मोदी आणि भाजपला केवळ काँग्रेसच पराभूत करू शकते, त्यामुळे... असंही म्हणाल्या आहेत.
Praniti Shinde
Praniti ShindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी गुरुवारी सोलापूर शहरातून अजमेरसाठी दर्गाहसाठी रवाना होणाऱ्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. तसेच या वेळी त्यांनी राजकीय विधानही केलं आणि एक भावनिक सादही घातली. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

अजमेरला जाणाऱ्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, 'देशात भाजपच्या सत्तेमुळे आज गरीब जनता, अल्पसंख्याक आणि दलित हे असुरक्षित आहेत. त्यामुळे राज्यात आणि केंद्रात जर काँग्रेसचे सरकार आले तर सर्वजण सुरक्षित राहतील. मोदी आणि भाजपला केवळ काँग्रेसच पराभूत करू शकते. तेलंगणा आणि कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात काँग्रेस पुन्हा सत्तेत आली तर आपल्या सर्वांचाच फायदा आहे.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Praniti Shinde
Sangli Politics : पवारांच्या 'वजीरा'ला महायुतीचा वेढा, बालेकिल्ल्यातच घेरलं!

याशिवाय तसेच 'लोकसभा आणि राज्यसभेतही मोदी काँग्रेसबाबत एवढं उलटसुलट बोलले. जर त्यांना एवढाच विश्वास असेल, तर मग ते एवढं उलटसुलट का बोलत आहेत. कारण त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे,' असंही प्रणिती शिंदे(Praniti Shinde) म्हणाल्या. तसेच प्रणिती शिंदे यांनी, अजमेर जाकर मेरे लिए दुआ करो और काँग्रेस फिर एक बार देश में सत्ता स्थापन करे...' असं भावनिक आवाहनही केलं.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे(Sushil Kumar Shinde) यांच्या कन्या प्रणिती शिंदे या एक उच्चशिक्षित तरुण आमदार आहेत. वयाच्या 28 व्या वर्षी त्या पहिल्यांदा सोलापूर शहर-मध्य या विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. 2009 पासून त्या सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. पहिल्या निवडणुकीत त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार नरसय्या आडम मास्तर यांचा पराभव केला होता. त्यानंतरच्या दोन्ही निवडणुका जिंकण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला होता.

Praniti Shinde
Ambadas Danve Aggressive : दानवेंनी कोल्हापुरात येऊन थेट 'या' नेत्याला दिलं आव्हान; म्हणाले, मस्ती चालणार नाही...

प्रणिती शिंदे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वर्किंग कमिटीच्या आमंत्रित सदस्य आहेत. दांडगा जनसंपर्क, मनमिळावू पण, प्रसंगी धाडसी आणि आक्रमक होण्याचा स्वभाव, प्रभावी वक्तृत्व या गुणांमुळे प्रणिती यांनी वडिलांप्रमाणेच अल्पावधीत स्‍वत:ला सिद्ध करून दाखवले आहे. प्रणिती शिंदे यांची एक ग्लॅमरस राजकारणी म्हणून राज्यात ओळख आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com