Pandharpur News : प्रणिती शिंंदेंनी मतदारसंघापुरते सीमित राहू नये; जिल्हाभर काम करावे : काँग्रेस नेत्याचा सल्ला

अलीकडच्या राजकीय घडामोडीमध्ये पक्षातील काही नेते गडबड करत आहे.
Prakash Patil-Praniti Shinde
Prakash Patil-Praniti ShindeSarkarnama

पंढरपूर : सोलापूर (Soalpur) जिल्ह्यात काॅंग्रेसची (Congress) अवस्था अत्यंत नाजूक आहे. ती सुधारण्यासाठी काॅंग्रेसच्या सर्वच आजी माजी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करणे महत्वाचे आहेत. आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी स्वतःचा मतदार संघ किंवा सोलापूर शहरापुरते सीमित न राहता, परिसिमेच्या बाहेर यावून काम करण्याची गरज आहे. तसे केले तरच जिल्ह्यात काॅंग्रेस जिवंत राहणार आहे, असा सल्ला पंढरपूर (Pandharpur) काॅंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील (Prakash Patil) यांना आमदार प्रणिती शिंदे यांना दिला. (Praniti Shinde should not limit herself to constituencies; Work across district : Prakash Patil)

पक्षातील काही बडी मंडळी गडबड करत असल्याने सर्वसामान्य कार्यकर्ता पक्षापासून विचलित होत आहे, असा गंभीर आरोप करत, आमदार प्रणिती शिंदे यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनाच घरचा आहेर दिला आहे.

Prakash Patil-Praniti Shinde
Supreme Court Hearing : बहुमत चाचणीपूर्वीच उद्धव ठाकरेंनी राजीनामा का दिला? युक्तीवादात सिब्बलांनी दिले उत्तर...

आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते इतिहासकालीन शस्त्र प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी व्यासपीठावरुन बोलतानाच काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे नाव न घेता खडे बोल सुनावले. आमदार शिंदे म्हणाल्या की, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे, तोपर्यंत इंदिरा गांधीची काॅंग्रेस जिवंत राहणार आहे. कोणीही काॅंग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला, तरी तो संपणार नाही. आजही जुन्या काळातील ज्येष्ठ आणि निष्ठावंताच्या बळावर काॅंग्रेस पक्ष टिकून आहे.

Prakash Patil-Praniti Shinde
Supreme Court Hearing : सुप्रीम कोर्टात मोठी घडामोड : सरन्यायाधीशांचा सवाल; ठाकरे गटाच्या वकिलांनी सुचविला ‘हा’ तोडगा

अलीकडच्या राजकीय घडामोडीमध्ये पक्षातील काही नेते गडबड करत आहे. त्याचा परिणाम पक्षातील कार्यकर्त्यांवर होत आहे. अनेक ठिकाणचे कार्यकर्ते विचलित झाले आहेत. पक्ष वाढवण्याची आणि तळागाळा पर्यंत पोचविण्याची जबाबदार सर्वांवर आली आहे. सोलापूर लोकसभा निवडणुक लढवण्यासंदर्भात अजून मी पूर्णपणे विचार केला नाही. त्यासाठी अजून वेळ असल्याचेही आमदार शिंदे यांनी स्पष्ट केले.

Prakash Patil-Praniti Shinde
Supreme Court Hearing : ठाकरे गटाच्या वकिलाकडून प्रश्नांचा भडिमार; सरन्यायाधीशांची महत्वाची टिप्पणी

प्रकाश पाटील म्हणाले की, काॅंग्रेस पक्षाला फार मोठी परंपरा आहे, त्यामुळे पक्ष जिवंत आहे. परंतु सध्याच्या राजकीय स्थितीमध्ये सोलापूर जिल्ह्यात काॅंग्रेसची अवस्था अत्यंत नाजूक आहे. ती सुधारण्यासाठी आतापासून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याची गरज आहे. जी काही काॅंग्रेस आहे, ती माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यामुळे जिवंत आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनी स्वतः मतदार संघा पुरते सीमीत न राहता, त्यांनी सोलापूर शहराची परिसिमी ओलांडून संपूर्ण जिल्ह्यात लक्ष देण्याची गरज आहे; अन्यथा यापेक्षा वाईट वेळ येऊ शकते असा सल्लाही पाटील यांनी दिला.

Prakash Patil-Praniti Shinde
Ashok Chavan News : माझा विनायक मेटे करण्याची चर्चा : अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले...

या वेळी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार, सुनंजय पवार, आदित्य फत्तेपूरकर, राहुल पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com