Prasad Lad : देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील मंत्री 'हे' नेते ठरवणार, प्रसाद लाड यांनी सगळच सांगितलं

Prasad Lad Amit Shah PM Narendra Modi Devendra Fadnavis cabinet : महायुतीला मिळालेले यश आणि मुख्यमंत्रि‍पदी देवेंद्र फडणवीस यांची झालेली निवड यामुळे आपण कोल्हापूरला जगदंबा मातेला नमन करायला आलो असल्याचे प्रसाद लाड यांनी सांगितले.
MLA Prasad Lad
MLA Prasad LadSarkarnama
Published on
Updated on

Prasad Lad News: मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या (रविवारी) होणार आहे. मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळणार याची चर्चा सुरू आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आमदार प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी त्यासंदर्भात भाकीत केले आहे. त्यामुळे मला देखील अपेक्षा आहे की उद्यापर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होईल. मात्र ज्याचं नाव केंद्रीय मंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी देतील तेच उद्या मंत्रिपदाची शपथ घेतील.', असा दावा लाड यांनी केला आहे.

महायुतीला मिळालेले यश आणि मुख्यमंत्रि‍पदी देवेंद्र फडणवीस यांची झालेली निवड यामुळे आपण कोल्हापूरला जगदंबा मातेला नमन करायला आलो असल्याचे प्रसाद लाड यांनी सांगितले.

शरद पवार हे राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत. जी भांडणं असतात ती फक्त निवडणुकीपुरती असतात. त्यामुळे पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेता ज्यांनी केंद्रात आणि राज्यात आपली छाप उमटवली आहे, अशा ज्येष्ठ नेत्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील आपला गुरु मानतात. त्यामुळे पवारसाहेबांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढणे चुकीचे असल्याचे आमदार लाड यांनी स्पष्ट केले.

MLA Prasad Lad
Pune Politics : पुण्यातून मंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार? CM फडणवीस पुण्यात येताच सस्पेन्स संपणार

'जंगला मधला राजा एकच असतो तो राजा म्हणजे नरेंद्र मोदी आहे. प्रियंका गांधी मोठ्या घराण्यातील आहेत. मोदींवर आरोप केल्याशिवाय त्यांचा अस्तित्व टिकू शकत नाही म्हणून ते आरोप करत आहेत. ईव्हीएमच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात पाच ते सहा वेळा निर्णय झाला आहे. जवाहर नेहरू यांनी देखील तीन वेळेला शपथ घेतली आहे, त्यानंतर तिसऱ्यांदा शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे वाघ आहेत.' असे लाड म्हणाले.

एकही मंदिर तुटणार नाही

दादरमधील हनुमान मंदिर तोडण्याच्या नोटीसवरून राजकारण पेटले आहे. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत त्याला विरोध केला आहे. त्यावर लाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, एकही मंदिर तुटणार नाही. एकही हनुमान मंदिर पाडले जाणार नाही. हा हिंदूंना शब्द आहे. मशिदीच्या जुन्या स्ट्रक्चरला आमचा आक्षेप नाही, पण कोरोनाच्या काळात ज्यांनी मशिदीवर अनेक मजले चढवले. त्यांना आमचा आक्षेप आहे. आम्ही मशिद पाडणार आणि मंदिर वाचवणार ही आमची भूमिका आहे.

काँग्रेस ठाकरेंनासोबत घेणार नाही

उद्धव ठाकरे यांची भूमिका म्हणजे 'हम दो हमारे दो' अशी झाली आहे. आता त्यामध्ये संजय राऊत आले आहेत. फॅमिली प्लॅनिंग सोडले तर संजय राऊत हा पाचवा आहे. त्यामुळे त्यांना एकला चलो नारा दिल्याशिवाय मार्ग नाही. उद्धव ठाकरेंची अवकात काँग्रेसला कळली आहे. त्यामुळे काँग्रेसच उद्धव ठाकरे यांना सोबत घेणार नाही. असा टोला आमदार लाड यांनी लगावला.

MLA Prasad Lad
Sanjay Raut : महागाई, सामाजिक अशांतता अन् शेतकऱ्यांचं आंदोलन, 'सामना'तून राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com