Madha Political News : माढा लोकसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असे घमासान सुरू आहे. दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर तुटून पडत आहेत. भाजप उमेदवार खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारासाठी माढ्यात आलेले युतीचे नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्यावर टीका करतात. तर शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ आलेले आघाडीचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi, केंद्रीय मंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतात. आता भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी ठाकरेंवर जहरी शब्दात वार केले आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री असलेले अरविंद केजरीवाल Arvind Kejriwal सध्या तुरुंगात आहेत. मुख्यमंत्री असूनही गैरव्यावहार केल्याने भाजप सरकारने त्यांच्यावर कारवाई केल्याचे बोलले जाते. याचे उदाहरण देत प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंना गंभीर इशारा दिला आहे. पंढरपूरमध्ये आलेले लाड म्हणाले, कोरोना काळात मेलेल्या माणसाच्या टाळू वरचे लोणी खाण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले आहे. गैरव्यावहार केलेले दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल वाचले नाहीत, त्याप्रमाणे आता उद्धव ठाकरेही वाचणार नाहीत, असे लाड म्हणाले.
भाजप आणि भाजपनेत्यांवर टीका करताना ठाकरेंनी Udhhav Thackeray, मी शेण खातो म्हणून तुम्ही खाता का? असा प्रश्न विचारला होता. यावर लाड म्हणाले, देशामध्ये एक पप्पू आहे तसा राज्यामध्ये सुद्धा एक उध्दव नावाचा पप्पू आहे. ते शेणच काय शेणाच्या पलीकडेचेही खातील. त्यांच्यासाठी ते दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत, असा शब्दात लाड यांनी ठाकरेंवर पलटवार केला आहे.
शिवसेनेच्या जाहिरातीत पॉर्नस्टारचा वापर असल्याची टीका भाजपकडून केली जात आहे. यावर लाड म्हणाले, युवराज यांना हे नवीन नाही. संध्याकाळ झाली की तेच आहे. त्यामुळे त्यांना ते नवीन नाही. मोहिते पाटलांना जवळ केले ही आमची चूक होती. त्याबद्दल मी माफी मागतो. तर बारामतीतून सुनेत्रा पवार Sunetra Pawar या एक लाख चाळीस हजार मतांनी निवडून येतील. निवडणुकीत मशालीची आईस्क्रीम होईल, तुतारी वाजणार नाही आणि पंजा गळून पडेल, अशी महाविकास आघाडीची अवस्था होईल, असाही टोला लाड यांनी लगावला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.