Sharad Pawar News : 'भेटून, फोनवर आणि खासगीत काय करायचं ते केलंय'; शरद पवारांनी टाकली गुगली

Sharad Pawar In Kolhapur : शरद पवार यांच्या जोडण्या महत्वपूर्ण ठरणार का? याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.
Sharad Pawar
Sharad Pawarsarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : लोकसभा ( lok Sabha Election ) असो किंवा विधानसभा ( Assembly Election ), प्रत्येकजण ही निवडणूक आपल्या पथ्यावर पाडण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला सर्वच राजकीय पक्षातील प्रमुख नेते अपवाद नाहीत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील राजकीय जोडण्या, डावपेच आखण्यात अनेकांचा मोठा हातखंडा असतो. त्याचा प्रत्येक आता आला आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील ( Kolhapur Lok Constituency ) महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती ( Shahu Maharaj Chhatrapati ) यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) पक्षाचे अध्यक्ष दौऱ्यावर आले होते. तेव्हा शरद पवार यांचा हा प्रत्यय दिसून आला.

शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी कोल्हापुरात लावलेल्या राजकीय जोडण्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत असतो. मग ती विधानपरिषद, विधानभा किंवा लोकसभा निवडणूक असो... या प्रत्येक निवडणुकीत शरद पवार यांनी लावलेल्या राजकीय जोडण्या यशस्वी ठरतात. काही ठराविक अपवाद सोडले, तर शरद पवार यांच्या जोडण्या आजपर्यंत कोल्हापुरात प्रभावी ठरल्या आहेत. कोल्हापुरातील तळागळातील कार्यकर्त्यांपासून वरिष्ठ पदाधिकाऱ्यापर्यंत पवार यांची नाळ जोडली आहे. त्यामुळे आजही शरद पवार यांना कोल्हापूर जिल्ह्यात आदराचे स्थान आहे.

श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्यासाठी गांधी मैदानात झालेल्या सभेनंतर शरद पवार यांनी पंचशील हॉटेलमध्ये अनेकांच्या भेट घेतल्या. याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर शरद पवार यांनी राजकीय जोडण्याचे संकेत दिले आहेत. कोल्हापुराची निवडणूक राज्यात चर्चेची विषय बनली असताना पवार यांनी लावलेल्या जोडण्या काय असू शकतात? हे विजयानंतर स्पष्ट होईल. पण, त्यांनी दिलेल्या संकेत महत्वपूर्ण आहेत.

"मी काही जणांशी भेटून, काही जणांना फोनवरून आणि काही जणांबरोबर खासगीत सुसंवाद केला आहे," असं सांगत शरद पवार यांनी मिश्किल हास्य केलं. त्यावरून शरद पवार यांच्या जोडण्या महत्वपूर्ण ठरणार का? याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.


( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com