Indrajit Sawant: फडणवीसांच्या गृह विभागाला कोरटकरचा पुळका? तपास रखडला, सावंतांनी पोलिसांनाच धाडली नोटीस

Indrajit Sawant sends notice to police: सत्ताधाऱ्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरडकर याला अभय दिला जातोय का? असा सवाल या तपासाच्या निमित्ताने उपस्थित होत आहे.
Prashant Koratkar Case Indrajit Sawant Sends Legal Notice to Police
Prashant Koratkar Case Indrajit Sawant Sends Legal Notice to PoliceSarkarnama
Published on
Updated on

Koratkar case news: छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या नागपूरच्या प्रशांत कोरटकर बद्दल गृह विभागाला पुळका आहे का? असा सवाल उपस्थित करण्याची वेळ आली आहे. कारण या प्रकरणाला एक वर्ष उलटले तरी अद्याप गृह विभागाने हा तपास पूर्ण केलेला नाही. त्यामुळे इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी पोलिसांना कायदेशीर नोटीस पाठवत जाब विचारला आहे.

एकीकडे टिपू सुलतान यांच्या बद्दल विधान केल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन संकपाळ यांना अनेक आरोपांना आणि टीकेला सामोरे जावे लागत आहे. मात्र दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरडकर याला अभय दिला जातोय का? असा सवाल या तपासाच्या निमित्ताने उपस्थित होत आहे. या घटनेला एक वर्ष झालं तरी तपास अद्याप जैसे थे असल्याचे समोर येत आहे.

त्या संदर्भात ऍडव्होकेट असीम सरोदे,ऍडव्होकेट श्रिया आवले,ऍडव्होकेट योगेश सावंत,ऍडव्होकेट हेमा काटकर,ऍडव्होकेट सकलेन यांच्यासह इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी पोलीस प्रशासनाला कायदेशीर नोटीस बजावत तपास अद्याप पूर्ण का नाही झाला? विचारणा केली आहे.

इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोन कॉल करून त्यांना शिवीगाळ करणे, धमकी देणे, मुख्यमंत्री ब्राम्हण आहे- आमचा आहे.अशी तंबी देणे यासह युगपुरुषाबाबत अत्यंत अश्लील, त्यांचे चारित्र्यहनन करणारे वक्तव्य प्रशांत कोरटकरने केले होते. समाज माध्यमांमध्ये हा कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमीमध्ये आणि इतिहास प्रेमी मध्ये संतापाची लाट उसळली होती.

Prashant Koratkar Case Indrajit Sawant Sends Legal Notice to Police
Sunetra Pawar News: सुनेत्रा पवारांकडून गंभीर दखल; अल्पसंख्यांक उपसचिवाला दणका, काय म्हटले आहे आदेशात?

याची दखल घेत पोलिसांना कोरटकर याच्या विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणे भाग पडले. अखेर दि.१ मार्च २०२५ रोजी शिवद्रोही प्रशांत कोरटकर विरोधात इंद्रजित सावंत यांनी दिलेल्या तक्रारीवरून जुना राजवाडा पोलीस स्टेशन येथे एफआयआर क्रमांक १५४/२०२५ नोंद करण्यात आली.

मात्र या घटनेला एक वर्ष उलटल्यानंतरही तपास झालेला नाही. न्यायालयाने जामीन दिल्यानंतर ज्या अटी आणि शर्ती कोरडकर ला घातल्या आहेत त्या शर्तीचे पालन त्याच्याकडून होते का? तो महाराष्ट्रातच आहे की दुबईला पळून गेला याचे उत्तर पोलिसांनी द्यावे अशी नोटीस इंद्रजीत सावंत यांनी दिली आहे.

तब्बल एकवर्षांपूर्वी हा प्रकार घडला होता. कोरटकर यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला. त्याला जामीन मिळाला. मात्र वर्ष होऊन देखील तपास झाला नाही. वेळोवेळी पाठपुरावा करून देखील वेगवेगळी उत्तरे दिली. पोलीस त्याचा पाठपुरावा करत आहेत की नाही. त्याची पाठराखण करत आहेत. त्यामुळे आता आम्ही कायदेशीर न्यायलयीन लढणार आहोत. अशी प्रतिक्रिया इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com