Pravin Gaikwad press conference : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी त्यांच्यावर झालेल्या शाईफेक आणि हल्ल्यानंतर आज पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. यावेळी त्यांनी आपल्यावर झालेला हल्ला भाजप पुरस्कृत असल्याचा आरोप केला.
पत्रकार परिषद प्रवीण गायकवाड यांनी सांगितलं की, अक्कलकोट येथे जो कार्यक्रम झाला त्यावेळी जन्मेजयराजे भोसले यांनी विनंती केल्यानंतर मी त्या कार्यक्रमाला जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी माझ्यावर शाईफेक आणि हल्ला करण्यात आला.
मात्र, कार्यक्रम संपल्यानंतर आयोजकांनी या घटनेचा साधा निषेध केला नाही. शिवाय त्यांनी तक्रार देखील दाखल केली नाही, अशी खंत यावेळी त्यांनी बोलून दाखवली. तसंच मला जी मारहाण झाली त्याचं भाजपच्या पीआर टीमने संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग करून बातमी व्हायरल केली याचा अर्थ काय घ्यायचा? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी दीपक काटेंचं गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे पुरावे दाखवले.
अशी पार्श्वभूमी असूनही काटेंना भारतीय जनता पार्टीचं युवा मोर्चाचं सरचिटणीस पद दिल्याचं त्यांनी सांगितलं. काटे सतत बावनकुळेंसोबत फिरत असतात. याआधी त्यांना पिस्तुल सापडल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. मात्र, त्या प्रकरणातून त्यांना बाहेर काढलं. जामीन करून दिल्यानंतर त्याला एक टास्क देण्यात आल्याचा गंभीर आरोप गायकवाड यांनी यावेळी केला.
दरम्यान, यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेतच भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक व्हिडिओ दाखवला. ज्यामध्ये ते म्हणतात, "आम्हाला तुमचा गर्व आहे. आता काम करा तुमच्यावर जबाबदारी दिली जाईल. देवेंद्रभाऊ आणि मी तुमच्या पाठीशी आहे." त्यामुळे बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काटेच्या पाठीशी असल्याचं गायकडवाड म्हणाले.
तर यावेळी त्यांनी काटेला जामीन मिळवून देऊन त्याला एक टास्क दिलं गेल्याचा मोठा दावा केला. शिवाय संघांच्या एका बैठकीत संभाजी ब्रिगेड, बामसेफ सारख्या संघटनांचा बंदोबस्त केला करण्यासाठी प्लॅन करण्यात आल्याचा आरोप देखील केला. तसंच दीपक काटे बावनकुळेंना गॉडफादर म्हणतो आणि ते त्याला मी तुझ्या पाठीशी असल्याचं सांगतात, असं म्हणत गायकवाडांनी हल्लेखोर काटेला पूर्णपणे भाजपचा पाठिंबा असल्याचा दावा केला.
दरम्यान, संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या नावात बदल करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, काही कायदेशीर मर्यादा आहेत. धर्मादाय आयुक्त हे जज असतात, तिथं प्रक्रिया करावी लागते. अर्ज केल्यानंतर लगेचच होतं असं नाही. छत्रपती संभाजी ब्रिगेड या नावाची आधीच नोंद असल्यामुळे तो शब्द आम्हाला शब्द मिळवण्यात अडचण होत असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्टीकरण दिलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.