Loksabha Election 2024 : निकालाचे भविष्य सांगा मिळवा २१ लाख... ‘अंनिस’चे आवाहन

Political News : लोकसभा निवडणुकीच्‍या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने देशातील सर्वच ज्योतिषांना निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तवून 21 लाख रुपये बक्षीस जिंकण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024sarkarnama

Satara Loksabha News : विविध स्तरांवरील निवडणूक निकालांचे भाकीत प्रत्येक निवडणुकीवेळी ज्योतिषी वर्तवत असतात. त्‍याला राजकीय नेते देखील बळी पडतात. त्‍यांच्‍या या कृतीमुळे गैरसमज पसरतात आणि अंधश्रध्दा निर्माण होतात. यामुळे या निवडणुकीच्‍या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने देशातील सर्वच ज्योतिषांना निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तवून 21 लाख रुपये बक्षीस जिंकण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठीही (Loksabha Election) अंनिसमार्फत ही आव्हान प्रक्रिया लोकप्रबोधनाचा हेतू नजरेसमोर ठेवून राबवली जात असल्याची माहिती महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे डॉ. हमीद दाभोलकर (Hamid Dabholakar) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. (Loksabha Election 2024 News )

Loksabha Election 2024
Chhatrapati Sambhajinagar Constituency : आठ दिवसाला पाणी, पण निवडणूक प्रचारात चर्चा दारूवर...

त्यासाठीची आवाहन प्रक्रिया, प्रश्‍‍नावली महाराष्ट्र अंनिसने जाहीर केली आहे. हे आव्हान राजकीय अंदाज वर्तवणाऱ्या राजकीय अभ्यासकांना नाही, तर ज्योतिष्यशास्त्राचा आधार घेऊन राजकीय भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषांना आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठीही अंनिसमार्फत ही आव्हान प्रक्रिया लोकप्रबोधनाचा हेतू नजरेसमोर ठेवून राबवली जात आहे.

जे ज्योतिषी या आव्हान प्रक्रियेत सहभागी होतील, त्यांना समितीमार्फत एक प्रश्नावली दिली जाईल. या प्रश्नावलीमध्ये अंनिसने ज्योतिषांना काही प्रश्न विचारले आहेत. त्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये नमुन्‍यादाखल निवडलेल्‍या उमेदवारांना किती मते मिळतील? व इतर अनेक प्रश्‍‍नांचा समावेश आहे. याचबरोबर त्‍यासाठी कोणती ज्‍योतिष पध्‍दती वापरली, याची माहिती देणेही आवश्‍‍यक आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)


प्रश्‍‍न आणि उपप्रश्‍‍नांसाठी गुणपध्‍दतही ठरविण्‍यात आली आहे. यात सहभागी होण्‍यासाठी पाच हजार रुपयांचे प्रवेशशुल्‍क असून, त्‍यासाठी डी. डी. सीलबंद पाकीटातून ता. 25 पर्यंत रजिस्टर पोस्टाने कार्तिक अपार्टमेंट, एफ-४, सहारा चौक, संजयनगर, सांगली - 416416 फोन नंबर - 0233-2312512 पत्त्यावर मिळणे बंधनकारक असल्‍याचेही पत्रकात नमुद केले आहे.

(Edited By : Sachin Wagmare)

Loksabha Election 2024
Satara Loksabha News : शंभूराज देसाईंच्या निवासस्थानाजवळील उदयनराजेंचे चित्र हटविले... काय आहे कारण...

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com