President Draupadi Murmu : राष्ट्रपतींच्या जेवणाचा मेनू, मटकी-वरणभात आणि करडईची भाजी

President Draupadi Murmu at Shani Shingnapur: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चौथऱ्यावर जाऊन शनैश्र्वराला केला तैलाभिषेक
Dropadi Murmu In Maharashtra :
Dropadi Murmu In Maharashtra :Sarkarnama
Published on
Updated on

Nagar News : देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी शनि शिंगणापूर येथे शनैश्वर मूर्तीचे चौथऱ्यावर जाऊन मनोभावे पूजा केली. या वेळी त्यांनी श्री शनैश्वर मूर्तीस तैलाभिषेक केला. शनैश्र्वराचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मंदिराच्या कार्यालयात प्रसाद घेतला. यात करडईची भाजी, मोड आलेली मटकी, वरण-भात आणि चपातीचा असे महाराष्ट्रीयन पद्धतीचे साधे जेवण घेतले. या वेळी राष्ट्रपतींच्या कन्यादेखील त्यांच्या सोबत होत्या.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज ( गुरुवारी ) सकाळी भारतीय वायुदलाच्या विशेष हेलिकॉप्टरने झापवाडी (ता. नेवासा) हेलिपॅड येथे आगमन झाले. राज्यपाल रमेश बैस यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. या वेळी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे, अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) संजय सक्सेना, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dropadi Murmu In Maharashtra :
Sanjay Shinde : त्या दुर्लक्षित 30 गावांचा विषय गाजणार अधिवेशनात...

राष्ट्रपतींचे श्री शनैश्वर मंदिरात आगमन झाल्यावर त्यांनी शनैश्वर मूर्तीचे दर्शन घेतले. उदासी महाराज मठात त्यांनी अभिषेक केला. अहमदनगर जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रपतींचा सत्कार केला. 

शनि शिंगणापूर संस्थानचे अध्यक्ष भागवत बनकर, उपाध्यक्ष विकास बनकर, कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ दरंदले यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना शनिदेवाची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सन्मान केला. 

Dropadi Murmu In Maharashtra :
Assembly Elections of 5 States : या राज्यात जेव्हा जेव्हा महिलांनी बंपर मतदान केले आहे, तेव्हा सत्तापरिवर्तन...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com