Satara Lok Sabha Constituency : कराड दक्षिण-उत्तरची दिलजमाई! साताऱ्यात काँग्रेसला हत्तीचं बळ

Prithviraj Chavan and Balasaheb Patil : लोकसभेत भाजपचा वारू रोखण्यासाठी काँग्रेसमधील दिग्गज आपापसातील मतभेद विसरून कामाला लागल्याने कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे.
Prithviraj Chavan, Balasaheb Patil
Prithviraj Chavan, Balasaheb PatilSarkarnama

Satara Political News : सातारा जिल्हा बँक, कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या गटातील संबंध ताणले गेले. निवडणुकीत दोन्ही नेत्यांनी परस्पर विरोधी भूमिका घेतल्या. कऱ्हाडसाठी महत्त्वाच्या असलेल्या बाजार समिती निवडणुकीत दोन्ही गट आमने-सामने आल्याने त्यांच्यातील दरी वाढली होती.

आता मात्र लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला रोखण्यासाठी दोन्ही नेत्यांनी आपापसांतील मतभेद विसरून काम करण्याचा निर्धार केला आहे. दोन्ही गटांत दिलजमाई झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारल्याचे दिसून येते. Prithviraj Chavan and Balasaheb Patil work together for Lok Sabha Election from Satara.

माजी मंत्री दिवंगत विलासराव पाटील-उंडाळकर यांची जिल्हा बँकेतील निवडणुकीत सोसायटी गटातून कायम उमेदवारी राहिली होती. त्याच गटातून जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तत्कालीन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी लढण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी उंडाळकरांचे पुत्र अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांना डावलण्यात आले. परिणामी त्यांनीही सोसायटी गटातूनच आमदार पाटील यांच्याविरोधात दंड थोपटले.

Prithviraj Chavan, Balasaheb Patil
Hemant Godse News : महायुतीतून सिटिंग खासदाराचा पत्ता कट; गोडसे शरद पवार गटाच्या संपर्कात?

जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे आमदार पाटील व अॅड. उंडाळकर गटात दरी वाढली. कऱ्हाड दक्षिणेत आमदार चव्हाण, उंडाळकर गटाचे विरोधक अतुल भोसले यांनी आमदार पाटील यांना मदत केली. त्यामुळे तालुक्यात आमदार पाटील व भोसले गटाचे नवे राजकीय समीकरण तयार झाले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर तालुक्यातील 100 वर सोसायट्यांच्या निवडणुकीतही त्याचे परिणाम दिसून आले.

जिल्हा बँकेनंतर शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली. अॅड. उंडाळकरांच्या ताब्यात असलेल्या बाजार समितीच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी आमदार पाटलांनी उंडाळकरांच्या विरोधी गट अतुल भोसलेंशी जवळीक साधली. त्या निवडणुकीत आमदार पाटील यांच्याबरोबर भोसले गट असल्याने उंडाळकरांना साथ देण्यासाठी आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) हे रणांगणात उतरले. त्या निवडणुकीत उंडाळकर व चव्हाण गटाच्या पॅनेलने विजय मिळवून बाजार समितीची सत्ता कायम राखली. मात्र, त्या निवडणुकीमुळे आमदार चव्हाण व आमदार पाटील गटातील दुरावा वाढला.

Prithviraj Chavan, Balasaheb Patil
Lok Sabha Election: 'NOTA'च ठरणार 'किंगमेकर'; खासदारकीचे स्वप्न पाहणाऱ्यांचा मतदारराजा उठवणार बाजार

सध्या लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) धूमशान सुरू आहे. त्यासाठी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट), शिवसेना (ठाकरे गट) व अन्य घटक पक्ष या निवडणुकीसाठी एकत्र आले आहेत. जातीयवादी पक्षाला रोखण्यासाठी महाआघाडी कटिबद्ध असल्याचे संबंधित आघाडीतील नेत्यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार आमदार चव्हाण व आमदार पाटील हे मतभेद विसरून मोठ्या कालावधीनंतर एकत्र आले आहेत.

आमदार चव्हाण यांनीही सहकारी संस्थांची निवडणूक नसून देशाचे भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. त्यासाठी सर्व जण मतभेद विसरून एकत्र आलो आहोत, असे जाहीर केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने का होईना, कराड दक्षिण आणि कराड उत्तरचे आमदार पुन्हा एकत्र आल्याचे समाधान त्यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांना आहे.

उंडाळकर गटही महाआघाडीसोबत

माजी मंत्री दिवंगत विलासराव पाटील-उंडाळकरांनी रयत संघटनेच्या माध्यमातून त्यांचा गट निर्माण केला आहे. उंडाळकर गटाची तालुक्यातील सहकारी संस्थांवर पकड होती. सहकारी संस्थांच्या निवडणुकीतूनच आमदार पाटील आणि उदयसिंह उंडाळकर (Udaysingh Undalkar) गटाबरोबरचे संबंध ताणले आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीसाठी उंडाळकर हे महाआघाडीसोबत आहेत. ते दोन दिवसांपूर्वी झालेल्या महाआघाडीच्या नेत्यांच्या संवाद मेळाव्याला उपस्थित नव्हते. मात्र, त्यापूर्वी त्यांच्या उपस्थितीत महाआघाडीच्या नेत्यांची बैठकही झाली आहे. त्यामुळे अॅड. उंडाळकर हे महाआघाडीसोबतच असल्याचे दिसत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Prithviraj Chavan, Balasaheb Patil
Loksabha Election 2024 : पालघरमध्ये महायुती अन् महाआघाडीचं ठरेना, 'बहुजन विकास आघाडी'चा सावध पवित्रा!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com