Prithviraj Chavan : उदयनराजेंचा पराभव निश्चित; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं गणित

Lok Sabha Election 2024 : उदयनराजेंनी अॅग्रिकल्चर कॉलेजची मागणी केली होती, अशी माहिती आहे. मात्र जमीन दिली तर त्यास मान्यता दिली जाते, पण मी कराडला सरकारी अॅग्रिकल्चर कॉलेज आणले, खासगी नाही. आता उणीदुणी काढण्यात काही अर्थ नाही.
Prithviraj Chavan
Prithviraj ChavanSarkarnama

Satara Political News : महायुतीत साताऱ्याबाबतचा तिढा सुटून उदयनराजेंना उमेदवारी मिळाली. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थित उमेदवारी अर्ज भरला. मुख्यमंत्री शिंदेंनी उदयनराजेंच्या विजयाची गॅरंटीही दिली. मात्र, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांच्या पराभवाचे गणित स्पष्ट केले आहे.

पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan मुख्यमंत्री असताना साताऱ्यात काही प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करत होतो, मात्र त्यावर त्यांनी सही केली नाही, असा आरोप उदयनराजेंनी केला. यावर बोलताना चव्हाणांनी ते आरोप हस्यास्पद असल्याचे सांगितले. उदयनराजे कोणत्या कामासाठी माझ्याकडे आले होते, हे तरी त्यांना आठवते का? त्यांनी अॅग्रिकल्चर कॉलेजची मागणी केली होती, अशी माहिती आहे. मात्र, जमीन दिली तर त्यास मान्यता दिली जाते. पण मी कराडला सरकारी अॅग्रिकल्चर कॉलेज आणले, खासगी नाही. आता उणीदुणी काढण्यात काही अर्थ नाही. धोरणात्मक बाबींवर चर्चा झाली पाहिजे. वैयक्तिक टीका नको, मात्र आमच्या जाहीरनाम्यातील त्रुटी त्यांनी सांगाव्यात, असे आवाहनही चव्हणांनी केले.

गतवेळी राष्ट्रवादीने परस्पर त्यांना उमेदवारी दिली. आम्हाला विचारले असते तर कामाचा उमेदवार देण्याची मागणी केली असती. मात्र, आघाडीचा धर्म पाळून आम्ही उदयनराजेंचे Udayanraje काम केले. त्यांना निवडून आणले. असे असतानाही त्यांनी जनतेच्या मताचा अनादर करत दोन-तीन महिन्यांतच राजीनामा दिला आणि साताऱ्यात पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून आले. त्यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन पक्षांनी त्यांचा 90 हजार मतांनी पराभव केला. आता तर आम्ही तीन पक्ष आहोत, त्यामुळे त्यांचा किती मतांनी पराभव होणार, हे बघावे लागेल, असा इशारा चव्हाणांनी दिला.

Prithviraj Chavan
Eknath Shinde News : 'आजचे शक्तिप्रदर्शन हा तर ट्रेलर, आता पिक्चर...'; CM शिंदेंनी दिली उदयनराजेंच्या विजयाची गॅरंटी!

साताऱ्यातून महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे Shashikant Shinde आहेत. त्यांनी आपला उमेदवारी अर्जही भरला आहे. आता मात्र त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. यावर चव्हाण म्हणाले, हे प्रकरण 2014 चे आहे. इतकी वर्षे ते झोपले होते का? त्यांना कुणाची मदत होती हे का. आता त्यांच्यासोबत कोण माथाडी कामगार नेता आहे हे पाहा, म्हणजे समजेल. आता अर्ज भरल्यानंतर त्यांना शहाणपण सुचले का? मात्र यात काही आश्चर्य वाटून घेण्याचे कारण नाही. दिल्लीत लोकांनी निवडून दिलेल्या मुख्यमंत्री केजरीवाल यांना तुरुंगात टाकले आहे. आरोप करून उमेदवारांच्या वाटचालीत अडथळे आणण्याची भाजपची ही चालच असल्याची टीका चव्हाणांनी केली.

(Edited by Sunil Dhumal)

R

Prithviraj Chavan
Sanjay Raut News : नवनीत राणांवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली; म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com