पृथ्वीराज चव्हाणांच्या अभिनंदनाचे फलक फाडले; सैदापूरात काँग्रेसप्रेमींतून संताप

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan यांनी सैदापूरसाठी Saidapur नागरी आरोग्य केंद्राला मंजुरी मिळवून दिली. जिल्हा परिषद ZP School प्राथमिक शाळेसाठी 50 लाख तसेच रस्त्यांसाठी काही निधी मंजूर करून दिला आहे.
Prithviraj Chavan's congratulatory plaque torn

Prithviraj Chavan's congratulatory plaque torn

karad reporter

Published on
Updated on

कऱ्हाड : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सैदापूर गावाच्या विकासासाठी सुमारे 65 लाखांचा निधी मंजूर केला आहे. या निधी मंजुरीबाबत श्री. चव्हाण यांच्या अभिनंदनाचे व आभाराचे फलक सैदापूर (ता. कऱ्हाड) येथील ग्रामस्थ आणि काँग्रेसच्यावतीने लावले होते. त्यातील अभियांत्रिकी महाविद्यालय ते आयटीआय मार्गावरील फलक काही समाजकंटकांनी फाडले. त्यामुळे काँग्रेसप्रेमी कार्यकर्त्यांतून संताप व्यक्त होत असून या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हिम्मत असेल तर विरोधकांनी पुढे यावे, असे आव्हान सैदापूरमधील काँग्रेसप्रेमींनी दिले आहे.

माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी सैदापूरसाठी नागरी आरोग्य केंद्राला मंजुरी मिळवून दिली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी 50 लाख तसेच रस्त्यांसाठी काही निधी मंजूर करून दिला. याबद्दल सैदापूर ग्रामस्थ व काँग्रेसप्रेमींनी या परिसरात ठिकठिकाणी आमदार चव्हाण यांच्या अभिनंदन व आभाराचे फलक लावले आहेत. त्यातील आयटीआयरोड ते अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मार्गावरील काही फलक फाडण्यात आले.

Prithviraj Chavan's congratulatory plaque torn

मार्चपर्यंत इंपेरिकल डेटा मिळण्यासाठी आग्रही : अजित पवार

त्याबद्दल कऱ्हाड तालुका काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष नानासाहेब जाधव, खादी ग्राम उद्योगचे तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव, माजी उपसरपंच सचिन पाटील, विकास सेवा सोसायटीचे माजी अध्य़क्ष बाळासाहेब प्रल्हाद जाधव, उदय थोरात, धनाजीराव जाधव, पंचायत समितीचे माजी सदस्य तानाजी माळी, सुनील जाधव, पांडुरंग जाधव, विवेक जाधव, वैशाली जाधव आदींसह काँग्रेसप्रेमी व ग्रामस्थांनी त्याचा निषेध केला.

Prithviraj Chavan's congratulatory plaque torn

सरकारच्या हातालाच नव्हे तर, बुद्धीलाही लकवा मारलाय...

यावेळी नितेश जाधव म्हणाले, ''पृथ्वीराज चव्हाण यांनी सैदापूर परिसरात 65 लाखांचा निधी दिला आहे. त्याबद्दल श्री. चव्हाण यांच्या अभिनंदनाचे व आभाराचे फलक सैदापुर ग्रामस्थ व काँग्रेसने लावले आहेत. त्यातील काही फलक समाजकंटकांनी फाडले आहेत. त्याविरोधात कऱ्हाड शहर पोलिसात या प्रकाराबद्दल गुन्हा दाखल केला आहे.

Prithviraj Chavan's congratulatory plaque torn

EWS : ५ एकराची अट हटवण्यासाठी खर्गे, राऊत व शरद पवार करणार प्रयत्न

लवकरच त्याचा तपास होवून यामध्ये जो कोणी दोषी सापडेल, त्याला ग्रामस्थ व कॉंग्रेसप्रेमी योग्य जागा दाखवतील. मात्र विरोधकांनी असले लपून छपून कृत्य करण्यापेक्षा हिंम्मत असेल तर थेट पुढे यावे. त्याला सामोरे जाण्याची आमच्यात धमक आहे. अशा निंदनीय कृत्य पुन्हा करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याची गय केली जाणार नाही, असाही इशारा त्यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com