Satara Vanchit Aghadi News : महाराष्ट्रात खासगीकरणाची सुरुवात झाली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यापेक्षा अधिक क्षमता व नैतिकता असणारी माणसे आहेत. आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हेही कंत्राटी पद्धतीने भरायला सुरुवात करा, असा टोला लगावून ही कंत्राटी पद्धत बेकायदेशीर असून, हे सरकारही पूर्णपणे बेकायदा आहे, अशी जहरी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील सरकारवर केली.
वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar यांनी आज साताऱ्यात शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी राज्य सरकारच्या भरती प्रक्रियेवर टीका केली. ते म्हणाले, महाराष्ट्रात खासगीकरणाची सुरुवात झाली असून, एकनाथ शिंदे Eknath Shinde, फडणवीस, पवार यांच्यापेक्षा अधिक क्षमता व नैतिकता असणारी अनेक माणसे आहेत.
आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हेही कंत्राटी पद्धतीने भरायला सुरुवात करा. नोकर भरतीत चार हजारांवर पदे भरायची असून, टीसीआय कंपनीने अर्जासाठी एक हजार घेतले आहेत. या भरतीत टीसीआयला १२० कोटींचा नफा झाला आहे. ज्यांचे अर्ज बाद होतील, त्यांचे एक हजार रुपये ही कंपनी परत देणार का, हा प्रश्न आहे.
मुळात नोकर भरती करण्याचा अधिकार हा पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनाही नाही. हा अधिकार लोकसेवा आयोगाला आहे. सरकारला काेणता आयोग ते ठरविण्याचा अधिकार आहे. निवडण्याचा नाही. हा अधिकारी राष्ट्रपती आणि राज्यपालांनाच आहे.
कंत्राटी पद्धत लागू करायला कुठेही परवानगी नाही. यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी लागते. संसदेने आणि विधानसभेने मंजूर केल्यानंतरच खर्च करण्याचा अधिकार येतो. कंत्राटी पद्धत आहे, ही बेकायदेशीर आहे. हे सरकार पूर्णपणे बेकायदा सरकार आहे.
Edited By Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.