Kolhapur Band News: कोल्हापूर प्रकरणात अधिक खोलात जावं लागेल; फडणवीस म्हणाले, 'विरोधीपक्षातील नेत्याने ..'

Kolhapur Bandh : असलं धार्मिक उदातीकरण खपवून घेणार नाही
Devendra Fadanvis
Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis On Kolhapur Bandh : अहमदनगरपाठोपाठ कोल्हापुरातही औरंगजेबाच्या (Aurangzeb) फोटोवरून राडा झाला आहे. शिवराज्याभिषेक दिनाच्या (Shivrajyabhishek Din) पार्श्वभूमीवर मुस्लीम तरुणांनी औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्यानं ही वादाची ठिणगी पेटली. याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी आज (बुधवारी) कोल्हापूर (Kolhapur) बंदची हाक दिली आहे.

यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समाजघटकांना इशारा दिला. "असलं धार्मिक उदातीकरण खपवून घेणार नाही. कोल्हापूर प्रकरणात अधिक खोलात जावं लागलं," असे फडणवीस म्हणाले.

Devendra Fadanvis
Attack On Women Sarpanch: दलित वस्तीत घुसून महिला सरपंचासह पतीस मारहाण ; माफी मागा, नाहीतर तलवारीने तुमचे तुकडे..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबई विमानतळाची पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. "हे विमानतळ २०२४ पर्यंत पूर्ण होईल," असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

कोल्हापुरात विरोधीपक्षातील एका नेत्याने काहीतरी घडणार असल्याचे सांगितले होते, त्यामुळे या प्रकरणाशी त्यांचा काही संबध आहे का, हे तपासण्यास येईल, असे फडणवीस म्हणाले.

मंगळवारी आक्रमक झालेल्या हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापुरातील दसरा चौक, टाऊन हॉटल, लक्ष्मीपुरी परिसरात दगडफेक केली. शिवाय आक्रमक हिंदुत्ववादी संघटनांनी शाहुपुरी पोलीस ठाण्यासमोर आंदोलनही केलं.

या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी आज बंद पुकारला आहे. या प्रकरणाचा योग्य तो तपास सुरु आहे, असे फडणवीस म्हणाले.

Devendra Fadanvis
Mega Bharti 2023 for 75000 posts : मुख्यमंत्र्यांनी शब्द खरा करुन दाखवावा ; घोषणा झाली, कृती कधी ? विद्यार्थ्यांचा सवाल

शिवराज्यभिषेक दिनी कोल्हापुरात (Kolhapur News) सात तरुणांनी आक्षेपार्ह व्हाॅट्सअॅप स्टेट्स ठेवल्याने संतप्त पडसाद उमटले. या घटनेनंतर कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक सबंधित तरुणांविरोधात कारवाई करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी लक्ष्मीपुरी आणि शाहूपुरी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या धरला. मंगळवारी (6 जून) दुपारी झालेला हा प्रकार रात्री उशिरापर्यंत सुरु होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com