प्रांताधिकाऱ्यांनी केलं अर्धेगाव जमीनदोस्त

कोपरगाव तालुक्यातील धोंडेवाडी या गावातील गायरान जमिनीवर अतिक्रमणे केल्याचा वाद उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात गेला होता.
Provinces did Ardhegaon Zamindost
Provinces did Ardhegaon ZamindostSarkarnama
Published on
Updated on

पोहेगाव ( जि. अहमदनगर ) : कोपरगाव तालुक्यातील धोंडेवाडी या गावातील गायरान जमिनीवर अतिक्रमणे केल्याचा वाद उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात गेला होता. न्यायालयाने या गावात 133 अतिक्रमणे असल्याचा निर्णय देत जिल्हा प्रशासनाला ही अतिक्रमणे काढण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार प्रांताधिकाऱ्यांनी कारवाई करत 133 अतिक्रमणे काढली. त्यामुळे सुमारे निम्म्या गावातील कुटूंबे उघड्यावर आली आहेत.

धोंडेवाडी (ता. कोपरगाव) येथील गायरान जमिनीवरील घरे, दुकाने व टपऱ्या अशी 133 अतिक्रमणे महसूल विभागाने पोलिस बंदोबस्तात काढली. प्रशासनाने नोटिसा दिल्याने काहींनी स्वतःच अतिक्रमणे काढून घेतली होती. या कारवाईने निम्मे गावच बेघर झाले आहे.

Provinces did Ardhegaon Zamindost
आशुतोष काळे म्हणाले, नगरपालिकेत सत्ता मिळविण्यासाठी कामाला लागा

धोंडेवाडी येथील गायरानावर मागील अनेक वर्षांपासून काही कुटुंबे राहात होती. काहींनी दुकाने थाटली होती. ही अतिक्रमणे काढावीत, यासाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने ही अतिक्रमणे काढण्याचे आदेश शासनाला दिले होते. त्यानंतर प्रशासनाने अतिक्रमणधारकांना नोटिसा दिल्या होत्या. त्यानुसार काहींनी स्वतः अतिक्रमणे काढून घेतली.

Provinces did Ardhegaon Zamindost
स्नेहलता कोल्हे यांनी पिचड कुटुंबीयांना भेटून दिली श्रद्धा व सबुरीची शाल

शुक्रवारी (ता. सात) महसूल प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात इतर 133 अतिक्रमणे हटविली. त्यामुळे निम्मे गाव बेघर झाले. अतिक्रमणधारकांनी आपले सामान आपापल्या शेतात वाहून नेले. शिर्डीचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, कोपरगावचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, शिर्डीचे पोलिस उपअधीक्षक संजय सातव, पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 90 पोलिस कर्मचारी, तसेच महसूल व पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

अनेकांना अश्रू अनावर जिरायत भाग असल्याने पावसावर शेती अवलंबून. पीक हाती आले, तर त्यातून गुजरान करायची. पै-पै साठवून राहण्यासाठी निवारा केला. मात्र आता त्यावर आपल्याच हाताने हातोडा मारावा लागत असल्याने अनेकांच्या डोळ्यांतून अश्रू तरळले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com