Devendra Fadnavis ajit pawar eknath shinde chandrakant patil
Devendra Fadnavis ajit pawar eknath shinde chandrakant patilSarkarnama

Chandrakant Patil News : चंद्रकांत पाटलांनी आणखी एक खडा टाकला; 'शिक्षक'ची उमेदवारी मिळवताना इच्छुकांना घाम फोडणार...

Chandrakant Patil Reviewing Candidates for Pune Teachers’ Constituency : महाविकास आघाडी, महायुतीकडून उमेदवारी कोणाला मिळते, यावर निवडणुकीचे चित्र काय राहणार, हे अवलंबून आहे. मात्र तत्पूर्वीच महायुतीमध्ये स्पर्धा लागल्याचे चित्र आहे.
Published on

Pune Teachers’ Constituency Election: High Stakes Political Battle: पुणे पदवीधरसाठी आतापासूनच महायुतीमध्ये स्पर्धा लागली असताना शिक्षक मतदारसंघात देखील तितक्याच वेगाने घडामोडी घडत आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लाडका पदाधिकारी मंगेश चिवटे हे पुणे शिक्षक मतदारसंघातून तयारी करत असताना भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी आणखी एका शैक्षणिक संस्थेतील प्रमुख व्यक्तीला उमेदवारीसाठी चुचकारले आहे.

कोल्हापुरात तीन दिवसांपूर्वी झालेल्या मेळाव्यात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात स्वामी विवेकानंद एज्युकेशन सोसायटीचे कौस्तुभ गावडे यांना उद्देशून ही विधान केले. पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आतापासूनच आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार दत्तात्रय सावंत, विनाअनुदानित शिक्षक संघटनेचे नेते खंडेराव जगदाळे यांच्यासह नव्याने इच्छुक असलेले शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे.

महाविकास आघाडी, महायुतीकडून उमेदवारी कोणाला मिळते, यावर निवडणुकीचे चित्र काय राहणार, हे अवलंबून आहे. मात्र तत्पूर्वीच महायुतीमध्ये स्पर्धा लागल्याचे चित्र आहे. पुणे शिक्षक मतदारसंघाचे नेतृत्व आमदार जयंत आसगावकर करीत आहेत.

मागील निवडणुकीत काँग्रेसकडून आसगावकर यांना उमेदवारी मिळाली. महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यांच्या विरोधात सोलापूरचे माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी तगडे आव्हान दिले.

Devendra Fadnavis ajit pawar eknath shinde chandrakant patil
Mamata Banerjee News : गावकऱ्यांच्या हल्ल्यात भाजप खासदार जखमी; ममता बॅनर्जींच्या मलमपट्टीने मनसुब्यांवर फेरले पाणी...

सावंत यांच्यासह बहुजन समाज पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, लोकभारती या पक्षांसह ३१ अपक्ष निवडणूक रिंगणात होते. खंडेराव जगदाळे यांनी माघार घेतली होती. त्यावेळी महाविकास आघाडीच्या सरकारचा फायदा जयंत आसगावकर यांना झाला.

माजी आमदार सावंत, खंडेराव जगदाळे यांनी देखील यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. तिघांच्या उमेदवारीबरोबर नव्याने शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे या निवडणुकीत उतरणार आहेत.

Devendra Fadnavis ajit pawar eknath shinde chandrakant patil
IPS death case : पोलिस महानिरीक्षकांच्या आत्महत्येचे गुढ वाढले; 9 पानी सुसाईड नोट अन् लाच प्रकरणातून खळबळजनक खुलासे

महायुतीतून उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी आतापासूनच प्रयत्न सुरू ठेवलेत. त्यांनीही वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून अनेकांचे प्रश्न मार्गी लावलेत. राजकारणातील अनेकांशी चांगले संबंध आहेत.

विनायक कोरे यांनीही विशाल माने यांना उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवलेत. त्यात चंद्रकांत पाटील गावडे यांना शिक्षक मतदार नोंदणी अधिक करा, तुमच्या उमेदवारीचं आपण बघूया, असा शब्द दिल्याचे सांगितले जाते. त्यामुळे महायुतीतून कोणाची उमेदवारी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com