Sangola Politics : गणपतराव देशमुखांच्या पट्टशिष्याला आमदारकीचे वेध; राष्ट्रवादीच्या साळुंखेंना आशीर्वादासाठी घातले साकडे

शेकापचे जिल्हा परिषदेमधील अभ्यासू व माजी आमदार (कै.) गणपतराव देशमुख यांचे अत्यंत जवळचे कार्यकर्ते, पट्टशिष्य म्हणून ॲड. सचिन देशमुख यांना ओळखले जाते.
Sachin Deshmukh
Sachin DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Solapur News: 'आबा जिकडे गुलाल तिकडे, हे समीकरण दृढ झाले आहे. गेल्या वेळेला आबा आमच्याकडे नसल्यामुळे आम्हाला गुलाल उधळण्याची संधी मिळाली नाही. यापुढे आबांनी मला आशीर्वाद द्यावा, असे शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ॲड. सचिन देशमुख यांनी एका सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दीपक साळुंखे यांना उद्देशून म्हटले. गेल्या काही दिवसांपासून शेकापमधील राजकीय परिस्थिती पाहता ॲड. देशमुख यांच्या भाषणाने त्यांच्या राजकीय भूमिकेकडे लक्ष लागले आहे. (PWP's Adv. Sachin Deshmukh's preparation to contest assembly elections)

शेकापचे (PWP) जिल्हा परिषदेमधील अभ्यासू व माजी आमदार (कै.) गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) यांचे अत्यंत जवळचे कार्यकर्ते, पट्टशिष्य म्हणून ॲड. सचिन देशमुख यांना ओळखले जाते. शेकापचे स्थानिक किंवा राज्य बैठक असो, (कै.) गणपतराव देशमुख यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात अनेकदा पाण्यासंदर्भातील बैठकांसाठी, मंत्रालयातही आबांसोबत (गणपतराव देशमुख) ॲड. देशमुख नेहमी जात असत. ते आता विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी उत्सुक असल्याचे त्यांच्या गेल्या काही महिन्यांतील हालचालीवरून दिसून येते.

Sachin Deshmukh
Ramdas Kadam : 'कदमांना संपविण्यासाठी ‘मातोश्री’त शिजलेली कटकारस्थाने उदय सामंत १९ तारखेला उघड करणार'

विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकी वेळीही (स्व.) गणपतरावआबांनी निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर विधानसभा लढविण्यासाठी सचिन देशमुख इच्छुक होते, असे बोलले जात होते, त्यासाठी शेकापचा बालेकिल्ला असलेला कोळा परिसरातून त्यांना विधानसभेचे तिकीट द्यावे अशीही मागणी झाली होती.

(स्व.) गणपतराव आबांच्या निधनानंतर शेतकरी कामगार पक्षामधील बदलत्या राजकीय वातावरणामध्ये त्यांना जुळवून घेता आल्याचे सध्या तरी दिसून येत नाही. ते पक्षाच्या बैठका व सभांमधून दिसत असले तरी शेकापमधील राजकीय वातावरणाशी व नेतृत्वाशी त्यांचे फारसे जमत नसल्याची सांगोला तालुक्यात चर्चा आहे.

त्यातच कोळे येथे राष्ट्रवादीचे दीपक साळुंखे यांच्या सर्वपक्षीय सत्कार समारंभात बोलताना आबांनी (दीपक साळुंखे) आता मला आशीर्वाद द्यावा, असे विधान देशमुख यांनी केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. ॲड. देशमुख पक्षांतर करणार की पक्षातच आपला गट निर्माण करणार याबाबत चर्चा होत आहे.

Sachin Deshmukh
Thackeray Vs Kadam : उद्धव ठाकरेंनी ‘ते’ सिद्ध केले तर मी त्यांच्या घरी भांडी घासेन : रामदास कदमांचे आव्हान

वाढदिवसाच्या बॅनरवरून देशमुखांचे नातू गायब

ॲड. सचिन देशमुख यांचा वाढदिवस नुकताच पार पडला. सचिन देशमुख कोळा जिल्हा परिषद गटाचे प्रतिनिधित्व करत असले तरीही त्यांच्या वाढदिवसा निमित्त संपूर्ण तालुक्यात आणि खासकरून सांगोला शहरात त्यांच्या समर्थकांनी जोरदार बॅनरबाजी केली होती. विशेष म्हणजे या बॅनरव (स्व.) गणपतरावआबांचा फोटो असला तरी त्यांचे दोन्ही नातू डॉ. अनिकेत देशमुख आणि डॉ. बाबासाहेब देशमुख हे दोन्ही डॉक्टरबंधू गायब होते, त्यामुळे सांगोला तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Sachin Deshmukh
Chavan on sanjay Jadhav : अशोक चव्हाणांनी टोचले खासदार संजय जाधवांचे कान : ‘उद्धव ठाकरे एवढ्या मोठ्या उंचीचा माणूस...’

मी गणपतरावआबांचा निष्ठावंत कार्यकर्ता

मी (स्व.) गणपतरावआबांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. शेकाप पक्ष सोडण्याचा प्रश्नच नाही. परंतु पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांवर कोणत्याही स्वरूपाचा अन्याय होऊ देणार नाही. तालुक्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे काळाची गरज आहे, असे गणपतराव देशमुखांचे पट्टशिष्य ॲड. सचिन देशमुख यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com