Radhakrishna Vikhe Patil : कर्जत-जामखेडमधील 'त्या' टँकर्सवरून विखे पाटलांचा पाराच चढला; तहसीलदारांना सुनावले !

Rohit Pawar Vs Ram Shinde : मागणी करूनही टँकर्स मिळत नसल्याची राम शिंदेची तक्रार
Ram Shinde, Radhakrishna Vikhe Patil, Rohit Pawar
Ram Shinde, Radhakrishna Vikhe Patil, Rohit PawarSarkarnama

Ahmednagar Political News : राज्य सरकार फोडाफोडीत व्यस्त असून त्यांना दुष्काळात होरपळणाऱ्या लोकांकडे लक्ष देण्यास वेळ नाही, अशी टीका करून आमदार रोहित पवारांनी कर्जत-जामखेडमध्ये पाण्याचे टँकर्स सुरू केले. या टँकर्सवरून महसूल विभागाच्या झालेल्या बैठकीत मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा पार चढल्याचे दिसून आले. तर आमदार राम शिंदेंनी मागणी करूनही टँकर्स मिळत नसल्याची तक्रार केली. यावरून विखे पाटलांनी तहसीलदारांना भर बैठीकत सर्वांसमोर खडेबोल सुनावले. (Latest Political News)

राज्यातील अनेक विभागात यंदा पावसाने ओढ दिली असून खरीप पेरा वाया गेल्याची स्थिती आहे. या स्थितीत लोकांना पिण्यासह पिके, जनावरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे टँकर आणि जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या जिल्हा आढावा बैठकीत महसूल विभागाला तातडीने पाहणी करून कार्यवाहीच्या सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrish Vikhe) यांनी दिल्या आहेत. मात्र यानिमित्ताने आढावा बैठकीत आमदार राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड तालुक्यात मागणी असूनही तहसीलदार टँकर दिले जात नसल्याची तक्रार करून अनेक प्रश्न उपस्थित केले.

Ram Shinde, Radhakrishna Vikhe Patil, Rohit Pawar
Clash In Ajit Pawar NCP : धाराशिव राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात राडा ! संजय बनसोडे यांच्यासमोर मोठा पेच

आमदार शिंदेंनी, 'तुम्हाला टँकर सुरू करू नका, असे कोणी सांगितले आहे का?', असा प्रश्न विचारला. मात्र तहसीलदार यावर गप्पच राहिले. तर पालकमंत्री विखेंनी 'या तालुक्यात कुणाचे फोटो लावून खासगी टँकर सुरू आहेत का?' असा प्रश्न विचारला. मात्र अधिकारी या प्रश्नांवरही निरुत्तर दिसले. बैठकीत कुणाचेही नाव घेतले नसले तरी मंत्री आणि आमदारांचे रोख आमदार पवारांकडेच असल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी तहसीलदारांना चांगलेच सुनावले.

Tanker in Karjat-Jamkhed
Tanker in Karjat-JamkhedSarkarnama

कर्जत-जामखेड तालुक्यात पिण्याच्या पाण्याची अनेक टँकर शहरासह ग्रामीण भागात आमदार रोहित पवारांनी जुलैपासूनच सुरू केले आहेत. या टँकर्सवर 'आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून मोफत पाणी पुरवठा' असा उल्लेख असून सोबत त्यांचा फोटो आहे. 'मतदारसंघात पावसाने ओढ दिल्याने आणि विद्यमान राज्य सरकार फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त असल्याने नागरिकांच्या अनेक गरजेच्या प्रश्नांकडे त्यांना लक्ष द्यायला वेळ नाही', असा आरोप करत पवारांनी समाज माध्यमातून करत टँकर्स सुरू केल्याचेही स्पष्ट केले आहे.

Ram Shinde, Radhakrishna Vikhe Patil, Rohit Pawar
Maharashtra Politics : राष्ट्रवादीचं हातचं राखून वागणं; भाजप-शिंदे गटाचं टेन्शन वाढविणारं...

आता आमदार शिंदेंनी नागरिकांची मागणी असूनही तहसीलदार टँकर्स सुरू करत नसल्याची तक्रार केली. यावर पालकमंत्री विखे यांनीही 'फोटो लावून कुणाचे टँकर्स सुरू आहेत,' अशी विचारणा आपल्याच अधिपत्याखालील महसूल अधिकाऱ्यांना केली. राम शिंदे आणि पालकमंत्री विखे यांचा रोख हा आमदार रोहित पवारांनी सुरू केलेल्या पाण्याच्या टँकर्सकडे होता. दरम्यान, मागणी आल्यानंतर पाच दिवसांत पाहणी करून तातडीने टँकर्स सुरू करा, असा आदेश पालकमंत्र्यांनी आढावा बैठकीत जिल्हा प्रशासनाला दिला आहे. जनावरांच्या छावण्यांऐवजी चारा छावण्या (डेपो) सुरू करण्याचेही प्रस्तावित आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com