राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकार समान लुटीच्या कार्यक्रमावर एकत्र...

भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe ) यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर - राज्यात महाविकास आघाडी व भाजपकडून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यात भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe ) यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. ( Radhakrishna Vikhe Patil said, Mahavikas Aghadi government together on the same looting program ... )

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार समान विकास कार्यक्रमावर एकत्र आले नसून समान लुटीच्या कार्यक्रमावर एकत्र आलं आहे. राज्यात फक्त लूट सुरू असून राज्यातील सामान्य जनता याचे परिणाम भोगतेय अशी जहरी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलीय.

Radhakrishna Vikhe Patil
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, मला आदित्य ठाकरे यांची कीव वाटते...

भाजप देशात जातीयवाद पसरवत असल्याची टीका शरद पवार यांनी केली होती. यावर आमदार विखे पाटील यांनी सांगितले की, मागे 2014 ला भाजप जेव्हा सत्तेवर आले तेव्हा यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा दिला होता. तेव्हा भाजप जातीवादी नव्हता?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Radhakrishna Vikhe Patil
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, तात्कालिक बदलांमध्ये जिल्हा बँक पुढेही शेतकऱ्यांचीच रहावी

सोयीप्रमाणे आपली भूमिका बदलायची लोकांनी त्यांच्याबाबतीतली भूमिका पाहिलेली आहे. उद्या काळाच्या ओघात भाजपच ते समर्थन करायला लागले तर आश्चर्य वाटायचं कारण नाही असे ही विखे पाटील यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com