राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, खंडणी वसुलीत आघाडी सरकार पटाईत

भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilParesh Kapase

नेवासे ( जि. अहमदनगर ) - कुकाणे (ता.नेवासे) येथे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आयोजित केलेल्या जनसंपर्क कार्यालय उदघाटन व भाजप बुथ कार्यकर्ता मेळावा आज झाला. या प्रसंगी बोलताना भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. ( Radhakrishna Vikhe Patil said, the Aghadi government failed in extortion collection )

या मेळाव्याला माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रेय काळे, भाजपचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी, युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रताप चिंधे, अदिनाथ पटारे, राजेंद्र लुणिया, देवीदास साळुंके, माजी जिल्हा परिषद सदस्या आशा मुरकुटेंसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Radhakrishna Vikhe Patil
Video: अजितदादांनी पुन्हा आमच्या सोबत यावे; राधाकृष्ण विखे पाटील

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षात फक्त खंडणी, दहशत आणि वसुलीचा एकमेव कार्यक्रम राबविला होता. पापाचा घडा भरल्याने हे सरकार उलथून पडले. नव्या सरकारचे संपुर्ण राज्यात स्वागत होत असुन या पुढील काळ सर्वांसाठी सुखाचाच राहील, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, अडीच वर्ष तालुक्यात सत्तेचा वापर करुन दहशत निर्माण करण्यात आली.त्यांच्या कर्माने ते पायउतार झाले आहेत अशी टिका माजी आमदार मुरकुटे यांनी माजी मंत्री गडाख यांचे नाव न घेता केली.विखे पाटलांच्या हातात असलेल्या झेंड्याला नेवासे तालुक्याचा दांडा कायम राहणार असल्याचे त्यांनी भाषणात सांगितले.

Radhakrishna Vikhe Patil
वाळू आणि बदल्यांच्या पैशात अडकलेल्यांचा भविष्यात हिशेब होणार - सुजय विखे

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूषणावह वाटेल असेच काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकारने सुरु केले आहे. अन्यायाला वाचा आणि जनतेच्या प्रश्नाला अग्रक्रम हे सरकार नक्कीच देईल असे सांगून विखे पाटील यांनी जाहीर भाषणात नेवासे तालुक्यात काहीच ओक्के नसल्याने मुरकुटे तुम्हीच आता पुढाकार घ्या, असे आवाहनही केले.

राज्यात पक्षाला मजबुती येण्यासाठी कार्यकर्त्यानी पंतप्रधान मोदी व युतीसरकारचे ध्येयधोरण व केलेली कामे जनतेपर्यंत न्यावी.प्रत्येक बुथ आणि गावाला बळकटी देणे आवश्यक आहे असे त्यांनी उपस्थित भाजप कार्यकर्त्यांना सांगितले. अशोक टेकणे यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com